spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आशा भोसले यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

आशा भोसले यांचे गाणे जितके मंत्रमुग्ध करणारे असते. त्याचप्रमाणे त्यांचा स्वभाव देखील लाखात एक आहे. हे म्हटले तरते अयोग्य ठरणार

मुंबई : सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायिका आशा भोसले यांचे गाणे जितके मंत्रमुग्ध करणारे असते. त्याचप्रमाणे त्यांचा स्वभाव देखीललाखात एक आहे. हे म्हटले तर ते अयोग्य ठरणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ज्येष्ठ गायिकाआशा भोसले यांनी भेट घेतली. नुकतीच राज यांच्या उजव्या पायावर शस्त्रक्रीया झाल्याने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीआशा भोसले या थेट राज ठाकरेंच्या घरी पोहचल्या. आशा भोसले या राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या दादरच्या निवास्थानी स्वतःहापोहचल्या.

हेही वाचा

ट्विटरवर व्हायरल होतायत स्ट्रेंजर थिंग्ज मधील पात्र…

 

राज ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबाचे सुरवातीपासून चांगले संबंध आहे. राज ठाकरे आणि आशा भोसले यांच्या या भेटींदरम्यानचा एकफोटो समोर आला आहे. यामध्ये राज यांच्या एका हातात वॉकिंग स्टीक असून त्यांच्या बाजूला आशा भोसले उभ्या आहेत. राज यांनीआशा भोसलेंच्या खांद्यावर हात ठेवला असून त्यांनीही दोन्ही हातांनी राज यांचा हात पकडल्याचं दिसत आहे. दोघेही कॅमेराकडे पाहूनहसताना दिसत आहेत. या फोटोमधून दोघांमधील जिव्हाळा स्पष्ट दिसतोय.

हेही वाचा

आनंदाची बातमी ! यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार

 

याआधीही राज ठाकरे शस्त्रक्रियेसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, तेव्हा त्यांच्या शरीरातकोरोनाचे डेड सेल्स आढळून आले होते. यामुळे त्यांना ॲनेस्थेशिया म्हणजे भुलीचे इंजेक्शन देता येऊ शकत नव्हते. त्यामुळेत्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती, मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून ही माहिती देण्यात आली होती. दोन परस्पर वेवेगळ्या क्षेत्रातील मंडळी जेव्हा केवळ आपुलकीने एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात हे नातं अनुभवायला मिळत.

Latest Posts

Don't Miss