spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यातही धर्मांतर विरोधी कायदा आणा, निष्पाप महिलांना न्याय मिळवून द्या नितेश राणेंची मागणी

मुंबई : देशात ठिकठिकाणी सक्तीचे धर्मांतर होत असल्याचे दृश्य हे वारंवार दिसत असते. अशी प्रकरणे समोर देखील येत असतात. मात्र, याप्रकरणी वेगवेगळ्या राज्यात धर्मांतर संदर्भात वेगवेगळे नियम देखील असल्याचे दिसून येते. भाजपाची सत्ता असल्याने अनेक राज्यांमध्ये राज्यस्तरावर धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. असाच कायदा महाराष्ट्रातही लागू करावा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून यासंदर्भात भाष्य केले, “आता महाराष्ट्रात भगवाधारी सरकार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची हीच वेळ आहे. आपण भोळ्या महिलांना यामध्ये अडकवण्यापासून आणि त्यामधून होणाऱ्या छळापासून वाचवू शकतो”. त्यापुढे जय श्रीराम असे म्हणत नितेश राणेंनी ट्विट केले आहे.

या दरम्यान, कर्नाटक सरकारने केलेल्या विधेयकात सक्तीचे धर्मांतर केल्यास 3 ते 5 वर्षाचा तुरुंगवास त्याचबरोबर 25 हजार रुपयांचा दंडाची तरतूद यामध्ये नमूद आहे. त्याचबरोबर अल्पवयीन महिला किंवा एससी, एसटी व्यक्तींचे धर्मांतर केल्यास 3 ते 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. असे कायदे महाराष्ट्रातही लागू करावे अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

हेही वाचा : 

आशा भोसले यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Latest Posts

Don't Miss