spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अक्षय कुमारचा ‘Selfiee’ पहिल्याच दिवशी ठरला फ्लॉप

बॉलीवूडचा (Bollywood) अँक्शन मॅन अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रोमँटिक हिरो इम्रान हश्मी (Emraan Hashmi) एका नवीन चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

बॉलीवूडचा (Bollywood) अँक्शन मॅन अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रोमँटिक हिरो इम्रान हश्मी (Emraan Hashmi) एका नवीन चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटाचे नाव ‘सेल्फी’ (Selfiee) असे आहे. अक्षय कुमार या चित्रपटात विजय कुमार एक सुपरस्टार हीरो ची भूमिका साकारतोय तर इम्रान हश्मी त्याच्या चाहत्याची भूमिका बजावली आहे. एक चाहता आपल्या आवडत्या हिरो सोबत एक सेल्फी घेण्यासाठी काय रंजक गोष्टी करतो हा प्रवास या चित्रपटात दाखवला आहे.

 अक्षय कुमार (akshay kumar) ने खिलाडी, पॅड मॅन असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत परंतु मागील वर्षापासून अक्षय चे काही चित्रपट बॉक्स ऑफिस (box office) वर जास्त चालले नाहित, आणि आता नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट सेल्फी सुद्धा फ्लॉप झाला आहे.

सेल्फी हा चित्रपट २४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३ कोटीची कमाई केली आहे. ‘सेल्फी’ (selfee) हा सिनेमा ‘ड्रायव्हिंग लायसेंस’ (Driving Licence) या मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. १५० कोटींच्या बजेटमध्ये सेल्फी सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. बिग बजेट सिनेमा असल्याने सिनेमातील प्रत्येकाला या सिनेमाकडून (cinema) खूप अपेक्षा होत्या. पण रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पडला आहे. आता येणाऱ्या वीकेंडला सिनेमा किती कमाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हे ही वाचा :

मुश्रीफांच्या अडचणीत वाढ, पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांचा ठिय्या

ठाकरे गटाची आजपासून राज्यभरात ‘शिवगर्जना’

Madhya Pradesh मध्ये भीषण अपघात, अमित शाह यांच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या तीन बसला भीषण अपघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss