spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विश्व सुंदरी मानुषी छिल्लर चा नवा सिनेमा

पँट शर्ट आणि लहान केसांमध्ये मानुषी खूपच वेगळी दिसते आहे.

मुंबई : विश्व सुंदरी मानुषी छिल्लरने सम्राट पृथ्वीराजसोबत तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, ज्यामध्ये ती राणी संयोगिताच्या भूमिकेत दिसली. अक्षय कुमार सारख्या मोठ्या हिरोसोबत पहिला चित्रपट मिळणे ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. एवढा मोठा कलाकार असूनही हा चित्रपट फ्लॉप ठरला. ज्याचं खापर अक्षय कुमारच्या माथी फोडण्यात आले. पण पहिला चित्रपट सुपर फ्लॉप ठरला असला तरी मानुषी छिल्लरला आणखी एका मोठ्या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून साईन करण्यात आले आहे.

हेही वाचा

आशा भोसले यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

अभिनेत्री मानुषी छिल्लर आता जॉन अब्राहमसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा एक अॅक्शनपट आहे ज्याची पहिली झलक काही महिन्यांपूर्वी शेअर करण्यात आली होती. मुख्य भूमिकेत जॉन अब्राहमचे नाव निश्चित झाल्यानंतर आता फीमेल लीडस्टारचे नावही निश्चित झाले आहे. तेहरान हा अ‍ॅक्शनने भरलेला चित्रपट आहे. त्यामुळे मानुषीही यात धमाकेदार अॅक्शन करताना दिसणार आहे. चित्रपटात त्यांचा लूक कसा असेल हेही समोर आले आहे. मानुषी खूप वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. पँट शर्ट आणि लहान केसांमध्ये मानुषी खूपच वेगळी दिसते आहे.

मानुषी छिल्लरने २०१७ मध्ये मिस वर्ल्ड बनून इतिहास रचला होता. सौंदर्य स्पर्धा जिंकण्यापूर्वी मानुषी मॉडेल होती. तिचा पहिला चित्रपट सम्राट पृथ्वीराज होता. ज्यामध्ये अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, त्यामुळे सोशल मीडियावर बराच गदारोळ माजला. अक्षय कुमारला या चित्रपटाच्या अपयशाचे कारण सांगण्यात आले या चित्रपटासाठी आवश्यक असलेले प्रयत्न अक्षयने केले नाहीत म्हणून परिणामी चित्रपट फ्लॉप झाला. यावरून मानुषीला खूप ट्रोल ही करण्यात आले होते.

 

Latest Posts

Don't Miss