spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Pune Bypoll Election, कसबा, चिंचवडमध्ये मतदानाला सुरुवात, कुणाचा गुलाल उधळणार ?

पुणे जिल्ह्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या दोन्ही ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या दोन्ही ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेकांनी सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदान केले आहे. या मतदानासाठी कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघात कडक पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आला आहे. तसेच आज दि. २६ फेब्रुवारी साठी मतदान होत आहे तर दि. २ मार्च रोजी या मतदानाचा निकाल हा जाहीर होणार आहे.

आज कसबा आणि चिंचवड मध्ये मतदान आहे. याठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. चिंचवड या मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे निवडणूक लढवत आहेत. तर कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत होत आहे.

तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत दिग्गजांनी जोरदार प्रचार केला होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप नेते आशिष शेलार यांनी या दोन्ही निवडणूक प्रचारात भाग घेतला होता. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मतदारांशी ऑनलाइन संवाद साधला होता. त्यामुळे गेली आठ दिवस या दोन्ही निवडणुकीतील राजकारण चांगलंच तापलं होतं.

कसबा या मतदार संघात महविकास आघाडीचे रवींद्र धगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने यांच्यात मुख्य लढत आहे. कसबा मतदार संघात १ लाख ३८ हजार ५५० महिला मतदार आहेत. तर १ लाख ३६ हजार ८७३ पुरुष मतदार आहेत. तर तृतीयपंथी मतदार ५ आहेत. कसब्यात एकूण ७६ मतदान केंद्र आहेत. तर बूथ संख्या २७० आहे. ९ मतदार केंद्र संवेदनशील आहेत. मतदानासाठी १३०० पोलीस कर्मचारी तैनात. एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झालं आहे. या निवडणुकीत घोडेबाजार सुरू असल्याने त्याअनुषंगाने १४ पथकं तैनात करण्यात आली आहेत. आज एकूण ५१० केंद्रावर मतदान होणार आहे. यात १३ संवेदनशील मतदान केंद्र आहेत. ५ लाख ६८ हजार मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

हे ही वाचा :

MIM कडून ‘मिशन महापालिका’च्या अनुषंगाने हालचाली सुरू, ते तीन पक्ष कोणते खुलासा होणार का??

पोलिसांविरोधात गावकरी बसले उपोषणाला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss