spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नवाज सिद्दीकी यांनी का घेलती मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट, ट्विट करत दिली नव्या प्रोजेक्टची माहिती

बॉलीवूडमधील (Bollywood) अनेक सिनेमामधील आपल्या अभिनयाने वेगळी छाप टाकून कोट्यवधी सिनेमारसिकांच्या मनावर राज्य करणार कलाकार नवाज सिद्दीकी (Nawaz Siddiqui) आता पुन्हा त्यांच्या चाहत्यांसाठी तो एकदा पुन्हा मराठी प्रोजेक्ट घेऊन आला आहे.

बॉलीवूडमधील (Bollywood) अनेक सिनेमामधील आपल्या अभिनयाने वेगळी छाप टाकून कोट्यवधी सिनेमारसिकांच्या मनावर राज्य करणार कलाकार नवाज सिद्दीकी (Nawaz Siddiqui) आता पुन्हा त्यांच्या चाहत्यांसाठी तो एकदा पुन्हा मराठी प्रोजेक्ट घेऊन आला आहे. काही वर्षाआधीच नवाज सिद्दीकी याने ठाकरे सिनेमामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून नवाज महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये पोहोचला होता आणि शिवसैनिकांच्या घराघरात पोहोचला होता. पुन्हा एकदा नवाज सिद्दीकी हा मराठी प्रोजेक्ट घेऊन मराठी पडद्यावर झळकणार आहे. मनसे प्रमुख्य राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेटही नवाजने घेतली. नवाज सिद्दीकी याने त्याच्या ट्विटर (Twitter) वर लवकरच आपण मराठी प्रोजेक्ट घेऊन येतोय अशी घोषणा केली आहे.

बऱ्याच दिवसापासून कौटूंबिक, पत्नीसोबतचा वादामुळे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी हा चर्चेत होता. मात्र या घटनेच्या दरम्यान नवाजने राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे का नवजाने राज ठाकरे यांची भेट घेतली अशा चर्चा राजकीय आणि सिनेमासृष्टीत रंगत होत्या. याच्या संदर्भात स्वतः नवाजने ट्विट या सरप्राईज चा खुलासा केला आहे. नवजने या ट्विट मध्ये लिहिले आहे कि मराठी भाषा दिवस साजरा करण्यात सुरुवात झाली आहे. मराठी नाटक मराठी नाटक, मराठी सिनेमा आणि महाराष्ट्राच्या लोककला यांचा मी चाहता आहेच. सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा !!. लवकरच अभिजीत पानसे यांच्यासोबत काहीतरी इंटरेस्टिंग येणार आहे. #जयमहाराष्ट्र, असे ट्विट नवाजने केले आहे.

ठाकरे या सिनेमामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारा नवाज आता कोणत्या रूपामध्ये समोर येणार आहे, मराठी प्रेक्षकांसाठी काय घेऊन येतोय याची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा राज ठाकरे यांच्या निवासस्थान शिवतीर्थ येथील एक फोटो समोर आला आहे. या प्लॅटमध्ये अभिजित पानसे देखील आहेत. याशिवाय या फोटोमध्ये राज ठाकरे यांचे चिरंजीव मनसे नेते अमित ठाकरे हे देखील या फोटो मध्ये दिसत आहेत. नवाजने राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन साहिणवारी भेट घेतली नवाज काही दिवसापासून कौटूंबिक अडचणींमध्ये अडकला आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याचा पत्नीसोबत वाद सुरु आहे. नवाज आणि त्याची पत्नी बारा वर्षांपूर्वीच वेगळे झाले आहेत. परंतु आता त्यांचे मुलांवरून सातत्याने वाद होत आहेत आणि या दोघांमधील वाद आता कोर्टापर्यंत पोहोचला आहे. या वादामुळे नवाजुद्दीन सिद्दीकी हा आता अडचणीत आला होता. या प्रकरणाच्या दरम्यान त्याने राज ठाकरे यांची भेट घेतली त्यामुळे राजकीय चर्चेमध्ये उधाण आले होते मात्र या भेटीचे कारण आता उघड झाले आहे.

हे ही वाचा :

MIM कडून ‘मिशन महापालिका’च्या अनुषंगाने हालचाली सुरू, ते तीन पक्ष कोणते खुलासा होणार का??

पोलिसांविरोधात गावकरी बसले उपोषणाला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss