spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अरे पोरगा झाला माझ्यामुळेच झाला… देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर सनसनाटी टीका

एका कार्यक्रमात बोलत असताना मुंबईतील विकासकामांच्या श्रेयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. मुंबईतील कोणताही प्रकल्प आम्ही हाती घेतला तर मीच हे काम केलं असा दावा केला आहे.

एका कार्यक्रमात बोलत असताना मुंबईतील विकासकामांच्या श्रेयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. मुंबईतील कोणताही प्रकल्प आम्ही हाती घेतला तर मीच हे काम केलं असा दावा केला आहे. जे लोक अडीच वर्षाच्या कार्यकाळात दोन वर्ष घरातच बसून होते, त्यांनी आम्हीच हे काम हाती घेतलं असं म्हणणं हस्यास्पद आहे. उद्या कुणाचं लग्न झालं तर माझ्यामुळेच झालं म्हणतील. उद्या एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला म्हणतील. त्यामुळे ही प्रवृत्ती सोडा, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली.

मुख्यमंत्री (Chief Minister) महोदय मला एक गोष्ट समजली नाही. तुम्ही कोणतंही काम सुरू केलं तर काही लोक म्हणतात आमच्याच काळात झालं. अरे अडीच वर्षापैकी दोन वर्ष तर ते घरातच होते. दरवाज्याच्या आतच होते. अन् सहा महिन्यात त्यांनी मुंबई (mumbai) बदलून टाकली? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. पुढे उद्धव ठाकरेंना उद्देशून देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘कोणतंही काम घेतलं तर आमच्याच काळात सुरू झालं असं सांगतात. काही लोकांची सवय अशी असते की, अरे याचा प्रवेश झाला मीच केला. अरे नोकरी लागली, मीच लावली. अरे लग्न झालं मीच जुळवून दिलं. अरे पोरगा झाला माझ्यामुळेच झाला. ही प्रवृत्ती सोडली पाहिजे.आता पोरगा झाला हा त्यांच्या कर्तृत्वाने झालाय. लग्न केलं तर त्यांच्या पसंतीने केलं. मला वाटतंय, मीच केलं मीच केलं हे सांगण्याची ही प्रवृत्ती सोडली पाहिजे. अरे तुमच्या काळात काहीच झालं नाही. म्हणून तर ही मुंबईची अशी अवस्था झाली आहे.

मला मुंबईकरांची क्षमा मागायची आहे. आम्ही एकावेळी अनेक काम हातात घेतली आहेत . त्यामुळे मुंबईकरांना थोडा त्रास होणार आहे. त्यामुळे आम्ही मुंबईकरांची क्षमा मागतोय कारण एकावेळी अनेक कामे घेतल्याने प्रदूषण होत आहे. ट्रॅफिक जाम होतंय. पण तुम्ही काळजी करू नका. दोन तीन वर्षात ही कामे पूर्ण झाली की तुम्हाला पुन्हा त्रास होणार नाही. नंतर ३० ते ४० वर्ष त्याकडे बघण्याची गरज पडणार नाही, अशी आश्वासक ग्वाही त्यांनी मुंबईकरांना दिली.

हे ही वाचा :

असदुद्दीन ओवेसी आणि भाजप हे खरे राम-श्याम, संजय राऊत यांनी दिले प्रत्युत्तर

Veer Savarkar Death Anniversary, सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्ताने जाणून घ्या त्यांचा प्रवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss