spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra Budget Session 2023, आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात

आज दि. २७ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार असल्याचे चर्चा आहे.

आज दि. २७ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार असल्याचे चर्चा आहे. शिंदे-ठाकरे गटात सुरू असलेला संघर्ष आणि राज्यातील राजकीय संघर्षाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्ष, शेतकऱ्यांचा मुद्दा, पोटनिवडणूक प्रचारातील गैरप्रकार यासह अनेक मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधक आमने-समाने येण्याची शक्यता आहे. तसेच राज्याचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. दरम्यान आज सभागृहात मिलिंद नार्वेकर हे दिसून आले आहेत. माउलिंद नार्वेकर हे आमदार नसतानाही सभागृहात आले त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.

आज मिलिंद नार्वेकर हे सभागृहात दिसले आहेत . आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) सभागृहात बसले. आदित्य ठाकरेंनी चूक निदर्शनास आणल्यानंतर नार्वेकर बाहेर गेले. सुरक्षारक्षकांनी नार्वेकरांना सभागृहात कसे सोडले? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही त्यांना बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या. नार्वेकरांच्या या कृतीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर मिलिंद नार्वेकर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तेव्हा ते म्हणाले, प्रेक्षक गॅलरी समजून चुकून सेंट्रल हॉलमध्ये जाऊन बसलो असे म्हणत नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिले आहे. चूक लक्षात आल्यावर लगेच बाहेर पडलो.

मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नार्वेकरांना भेटत राहिल्याने या सरकारमध्ये नार्वेकरांना महत्त्व आलं आहे. एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवात नार्वेकरांच्या घरी आल्याने या दोघांमधील मैत्री उघड झाली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतही तर मिलिंद नार्वेकर साऱ्यांचे मित्र असल्याने ते चांगल्या मतांनी जिंकल्याचे फडणवीस म्हणाले होते. तसेच एकनाथ शिंदे यांच्याशी देखील नार्वेकरांची जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात नार्वेकरांची जोरदार चर्चा सुरु आहे.

हे ही वाचा :

The CSR Journal चा प्रतिष्ठेचा ‘लीडरशीप फॉर सोशल चेंज अवॉर्ड’ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बहाल..!

Maharashtra Assembly Budget Session, आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, नव्या राज्यपालांनी केले अभिवादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss