spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाकरे गटाच्या युक्तिवादाने शिंदे गट गार, थेट प्रतोदपदी नियुक्ती केलेल पत्रच कोर्टात केले सादर

उच्च न्यालयाच्या निर्णयानंतर शिवसेना हे नाव आणि चिन्ह पुन्हा ठाकरे गटाकडे गेले. परंतु सत्तासंघर्षाचे हे राजकारण अजून संपले नाही. गेल्या आठवड्यात जेष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्या जोरदार युक्तिवादाने शिंदे गटाला चांगलेच कोड्यात टाकले होते.

उच्च न्यालयाच्या निर्णयानंतर शिवसेना हे नाव आणि चिन्ह पुन्हा ठाकरे गटाकडे गेले. परंतु सत्तासंघर्षाचे हे राजकारण अजून संपले नाही. गेल्या आठवड्यात जेष्ठ वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्या जोरदार युक्तिवादाने शिंदे गटाला चांगलेच कोड्यात टाकले होते. या सत्तासंघर्षाची सुनावणी अजून सुप्रीम कोर्टात सुरू आहे. ठाकरे गटाकडून युक्तिवाद सुरूच आहे. आज कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडल्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू लढवत तासभर युक्तिवाद केला. यानंतर ठाकरे गटाचे तिसरे वकील देवदत्त कामत युक्तिवाद करत आहेत . आपण प्रतोदपद नियुक्तीच्या मुद्द्यावर युक्तिवाद करणार असल्याचं देवदत्त कामत (Devdutt Kamat) यांनी सरन्यायाधीशांना सुरुवातीलाच निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर त्यांनी युक्तिवादाला सुरवात करून शिंदे गटाला गारद केले.

शिंदे गटाने गुवाहाटीमध्ये (Guwahati) बसून पक्ष प्रतोद बदलून आमदार भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती केली होती. यासंदर्भातील शिंदे गटानं सादर केलेले पत्रच देवदत्त कामत यांनी कोर्टासमोर सादर केले. या पात्रात शिंदे गटाकडून (shinde group) लेटरपॅडवर शिवसेना विधीमंडळ पक्ष असा उल्लेख देखील केला असल्याचे देवदत्त कामत यांनी युक्तिवाद करताना कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

संसदीय कामकाजाशी व्हीप चा काही संबंध नसतो. व्हीप हा राजकीय पक्षाकडून नियुक्त केला जातो,परंतु शिंदे यांनी दिलेलं पत्र राजकीय पक्षाचं नसून विधीमंडळ पक्षाचं आहे त्या पत्रावर ‘शिवसेना (shivsena) विधीमंडळ पक्ष ‘असा उल्लेखही केला होता त्यामुळे हे फक्त प्रक्रियात्मक कामकाजातील अनियमिततेचे प्रकरण नाही तर घटनात्मक बेकायदेशीर रित्या गोष्टी हातात घेण्याचे प्रकरण आहे”, असा जबरदस्त युक्तिवाद देवदत्त कामत यांनी कोर्टात केला आहे. तसेच ३ जुलै २०२२ रोजी सभापतींचा निर्णय विधीमंडळाच्या कार्यवाहीत नसल्याचे देवदत्त कामत म्हणाले.

हे ही वाचा :

कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, छगन भुजबळ यांची सभागृहात मागणी

Maharashtra Assembly Budget Session, आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, नव्या राज्यपालांनी केले अभिवादन

Latest Posts

Don't Miss