spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Holika Dahan 2023, होळी दहनासाठी झाडे तोडल्यास भोगावा लागेल कारावास

भारत (INDIA) हा सार्वभौम देश आहे. तो त्याच्या प्राचीन संस्कृतीसाठी ओळखला जातो. भारताचे वैशिष्ट्य म्हणजे इथे विविधतेत एकता पाहायला मिळते. भारतातील सण हे भारताच्या परंपरेचं वैशिष्ट्य आहे. इथे सर्व सण तेवढ्याच जलोषाने साजरे केले जातात.

भारत (INDIA) हा सार्वभौम देश आहे. तो त्याच्या प्राचीन संस्कृतीसाठी ओळखला जातो. भारताचे वैशिष्ट्य म्हणजे इथे विविधतेत एकता पाहायला मिळते. भारतातील सण हे भारताच्या परंपरेचं वैशिष्ट्य आहे. इथे सर्व सण तेवढ्याच जलोषाने साजरे केले जातात. अशातच आता होळीचा सण देखील येणार आहे. होळीच्या (Holi 2023) दिवशी आनंदाने , उत्साहाने , एकमेकांवर रंग उधळला जातो. होळीच्या दिवशी धूलिवंदन च्या आधी होलिका दहन (Holika Dahan 2023) केलं जातं. दरवेळी होलिका दहनासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात. यामुळे झाडांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते तसेच शहरी भागात दाटीवाटीच्या प्रदेशात जेथे झाडांची अतिशय आवश्यकता असते , तेथे झाडांची संख्या कमी होऊन प्रदूषण , ऑक्सिजन ची कमतरता अश्या समस्या उद्भवतात.

ज्या व्यक्तींनी व सेवाभावी संस्थानी ती झाडे लावण्यासाठी व वाढविण्यासाठी परिश्रम घेतले असतात, त्यांचे परिश्रम वाया जाऊन त्यांची निराशा होते. याबाबत कित्येकदा अनेक संस्थांकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे . यामुळे आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नागरिकांना होळी २०२३ (Holi 2023) साजरी करा पण झाडे तोडू नका, असं आवाहन केलं आहे.पोलिसांची जारी (Mumbai Police) केलेल्या आदेशात म्हटलं आहे की, जेथे यापूर्वी असे प्रकार घडले आहेत, अशा सर्व ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त असेल. जेणेकरून होळी साजरी करण्यासाठी झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार नाही.

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आपल्या सर्व पोलीस ठाण्यांना आदेश जारी करण्यास सांगितले आहेत कि , होळीच्या दिवशी कोणीही झाड तोडताना आढळल्यास त्या नागरिकावर कारवाई करण्यात यावी. झाडे तोडणे हा मोठा गुन्हा असून जर कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीररित्या कडक कारवाई केली जाईल. महाराष्ट्र राज्य झाडे संरक्षण कायदा, १९५१ नुसार झाडे तोडणे हा गुन्हा आहे. या कायद्याचे उल्लंघन झाल्यास उपरोक्त कायदयाच्या कलम २१ नुसार कमीत कमी रूपये१,०००/- व जास्तीत जास्त रूपये ५,०००/- एवढा दंडास गुन्हेगार पात्र असेल तर कमीत कमी एक आठवड्याच्या कारावासाची शिक्षा सुद्धा देण्यात येईल.

हे ही वाचा :

The CSR Journal चा प्रतिष्ठेचा ‘लीडरशीप फॉर सोशल चेंज अवॉर्ड’ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बहाल..!

Maharashtra Assembly Budget Session, आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, नव्या राज्यपालांनी केले अभिवादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss