spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आता मुंबईत देखील बॅनरबाजी? पुणे पोटनिवडणुकीच्या निकालाआधीच उमेदवारांचा आमदार म्हणून केला उल्लेख

सध्या पुण्यात पोटनिवडणुकीचे वारे अगदी जोमाने वाहू लागले आहे . कसाबा पेठ आणि चिंचवड महानगरपालिकेसाठी पोटनिवडणूका घेण्यात आल्या .

सध्या पुण्यात पोटनिवडणुकीचे वारे अगदी जोमाने वाहू लागले आहे . कसाबा पेठ आणि चिंचवड महानगरपालिकेसाठी पोटनिवडणूका घेण्यात आल्या . ह्यामध्ये आपल्याला भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत बघायला मिळाली . ही लढत अगदी चुरशीची असल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह देखील शिगेला पोहोचलेला होता आणि ह्याच उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी कसबा पेठ मध्ये आपापल्या पक्षांच्या उमेदवारांचे फोटो आणि सोबतच आमदार असा उल्लेख करून रस्त्यावर फलक लावलेले . ह्या पोटनिवडणुकेसाठी कसबा पेठेतून भाजप कडून हेमंत रसाने आणि काँग्रेस कडून रवींद्र धंगेकर हे उमेदवार रिंगणात उतरले आहे.कसबा पेठेतील ह्या पोस्टरबाजीवर पोलिसांनी कारवाई देखील केली.

हि पोस्टरबाजी फक्त कसबापेठे पर्यंत स्तिमित न राहता चिंचवड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी ह्याचा अवलंब केला आहे . त्यांनी भाजप चे उमेदवार ‘अश्विनी लक्ष्मण जगताप’ ह्यांची आमदार पदावर नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन अशा आशयाचे फलक पुणे मुंबई द्रूतगती मार्गावर लावले आढळले . ह्यात देखील अश्विनी जगताप ह्यांचा उल्लेख आमदार म्हणून केलेला दिसून येतो. पुण्यावरून मुंबईला जाताना लागणाऱ्या उर्से टोलनाक्यावर हे मोठ मोठे फलक लावले आहे .अश्विनी जगताप ह्यांच्या सोबत काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे हे देखील निवडणुकीसाठी उभे आहे.चिंचवड पोटनिवडणुकीच्या तिहेरी लढतीचा निकाल हा काही तासातच जाहिर होणार आहे . गुरुवारी मतमोजणीला सुरुवात होणार आहे परंतु निकाल आधीच केलेल्या ह्या पोस्टरबाजीमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राजकीय वर्तुळात देखील ह्याची चांगलीच चर्चा रंगली आहे . आता ह्या चुरशीच्या निवडणुकीती नेमका कोण बाजी मारतं हे बघण्याची उत्सुकता मतदारांना आहे.

Latest Posts

Don't Miss