Wednesday, September 25, 2024

Latest Posts

राष्ट्रपतीच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय

नवी दिल्ली : भारताच्या पंधराव्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. भाजपप्रणित एनडीएतर्फे द्रौपदी मुर्म या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणार. पहिल्या फेरीतील खासदारांच्या मतमोजणी दरम्यान द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित झाला होता. द्रौपदी मुर्मू यांना 540 तर यशवंत सिन्हा यांना 208 मत मिळाली होती. तर दुसऱ्या फेरीतल्या मतमोजणीत द्रोपती मुरमा यांना 1349 मत पडली होती तर यशवंत सिन्हा यांना 537 मत मिळाली होती.

 जिद्ध असली तर कोणतीही गोष्ट महिला सहजरित्या साध्य करू शकते. याचे उदाहरण म्हणजेच द्रौपदी मुरूम यांच्या रूपाने आज पाहायला मिळाले. निकाल जाहीर होण्यापूर्वीच मुर्मू यांचे मूळ गावी रायरंगपूर येथे जल्लोष साजरा केला जात होता. मुर्मू यांची मावशी सरस्वती म्हणाला, “आमच्या काळात मुलींना नेहमी सांगितले जायचे की तू अभ्यास करून काय करशील लोक तिला विचारायचे की तू काय करू शकणार आता ती काय करू शकेल हे तिने सिद्ध केलं आहे”, द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पदाची शपथ 25 जुलै रोजी घेतील. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे.

हेही वाचा : 

मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांची मोठी कामगिरी, “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत ७४५ मुलांची सुटका

Latest Posts

Don't Miss