spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Holi 2023, रसायनयुक्त रंग टाळा आणि बनवा घरच्या घरी नैसर्गिक रंग

होळीच्या सणाला (Holi festival) आता काही तास शिल्लक राहिले आहेत. होळीच्या दिवशी रंग खेळण्याची प्रत्येकाला खूप उत्सुकता असते. परंतु होळीच्या दिवशी रसायनयुक्त रंगांची भीती असते.अनेक वेळा होळीच्या दिवशी रसायन रंगांमुळे चेहरा खराब होतो प्रत्येकाला आपल्या त्वचेची काळजी असते.

होळीच्या सणाला (Holi festival) आता काही तास शिल्लक राहिले आहेत. होळीच्या दिवशी रंग खेळण्याची प्रत्येकाला खूप उत्सुकता असते. परंतु होळीच्या दिवशी रसायनयुक्त रंगांची भीती असते.अनेक वेळा होळीच्या दिवशी रसायन रंगांमुळे चेहरा खराब होतो प्रत्येकाला आपल्या त्वचेची काळजी असते. रासायनिक रंगांमुळे आपल्या चेहऱ्यावर त्याचे दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे काही जण होळीचा सण साजरा करण्याचे टाळतात. या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला नैसर्गिक रंगाची होळी खेळायचे असेल तर तुम्हाला फुलांच्या सहाय्याने घरच्या घरी रंग बनवता येतात फुलांपासून बनवलेल्या रंग तुमचे चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी मदत करतात चला पाहूया फुलांपासून रंग बनवण्याचे काही घरगुती उपाय आणि पद्धती.

पिवळा रंग (Yellow color)
पिवळा रंग हा आनंद आणि आशांचं प्रतीक मानले जाते एवढेच नाही तर पिवळा रंग खूप शुभ मानला जातो बाजारामध्ये मिळणारा पिवळ्या रंगात असे अनेक घटक मिसळलेले असतात ज्यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते हे रंग टाळण्यासाठी आपण पूर्णपणे नैसर्गिक पिवळा रंग बनवू शकतो पिवळा झेंडू किंवा शेवंताच्या फुलांनी पिवळा रंग बनवता येतो.

निळा रंग (blue color)
निळा रंग हे शांततेचा प्रतीक मानले जाते आता तुम्ही नैसर्गिक सुद्धा बनवू शकता आणि घरच्या घरी निळा रंग बनवण्यासाठी गुलमोहराच्या फुलांचा वापर करता येतो.

केशरी रंग (Orange color)
केशरी रंग हा कोणत्याही सणाचा उत्साह वाढवण्याचे काम करतो त्यामुळे केशरी रंग हा सर्वात महत्त्वाचा रंग मानला जातो पळसाच्या फुलांपासून तुम्ही केशरी रंग बनवू शकता.

लाल रंग (red color)
आपणा सर्वांना माहिती आहे लाल रंग हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते होळीच्या दिवशी लाल रंगाचा टिळा लावण्याची प्रथा आहे लाल रंग जरी बाजारात सहज मिळत असला तरी केमिकल पासून बनवला जात असल्याने त्याचे दुष्परिणाम ही आपल्या आरोग्यावर आणि आपल्या शरीरावर होऊ शकतात तुम्ही घरी लाल गुलाब लाल जास्वंद यांसारख्या लाल फुलांपासून नैसर्गिक रंग बनवू शकता

जांभळा रंग (Purple color)
तुम्ही घरच्या घरी जांभळा रंग अगदी सहजपणे बनवू शकता एवढेच नाही तर तुला पासून बनवलेल्या जांभळा रंग वापरल्यास त्याच्या मुलायम आणि चमकदार सुद्धा होते हा रंग त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे लावेंदरच्या फुलांच्या मदतीने तुम्ही हा रंग बनवू शकता.

हिरवा रंग (green color)
असं म्हटले जाते की हिरव्या रंगाच्या होळीचा सण हा अपूर्ण आहे पाण्याच्या मदतीने तुम्ही घरी सहज हिरवा रंग वाढवू शकता यासाठी तुम्ही कलिंगडच्या पानांचा वापर करू शकता.

नैसर्गिक कोरडा रंग बनवण्याच्या पद्धत –
जर तुम्हाला नैसर्गिक कोरडे रंग घरच्या घरी बनवायचा असेल तर सर्वात आधी ज्या फुलांपासून तुम्हाला रंग बनवायचे आहे ती फुले गोळा करा तुमच्या घरी जर बाग असेल तर उत्तमच नसेल तर फुले बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध होतात ही सर्व फुले नीट धुवावी नंतर ते उन्हामध्ये वाळत घालावेत सर्व फुलं सुखतात त्यांची पाने वेगळी करून चांगली बारीक करून पावडर बनवा यामध्ये चंदनाच्या तेलाचे दोन ते तीन थेंब कमी घालू शकता त्यामुळे चांगला सुगंध सुद्धा येतो

ओला रंग बनवण्याच्या पद्धत –
नैसर्गिक ओला रंग बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्ही फुले गोळा करा सर्व फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करा आणि आता त्या पाकळ्या पाण्यामध्ये भरलेल्या बादलीमध्ये टाका चांगला सुगंधासाठी तुम्ही त्या पाण्यामध्ये चंदनाचे तेलही घालू शकता फुलांच्या पाकळ्या रात्रभर पाण्यामध्ये राहू द्या सकाळी ओला रंग तयार होईल.

हे ही वाचा :

Sandeep Deshpande घेणार आज पत्रकार परिषद, हल्ल्याप्रकरणी तपासाला वेग तर २ जण ताब्यात

मराठवाड्यात आजपासून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss