spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अभिनेता रणबीर कपूर तयारीत व्यस्थ, बाळाच्या येण्याची उत्सुकता

प्रत्येक नवीन पालकांप्रमाणे. आम्ही कथा वाचतो, आम्ही नर्सरी बनवायला सुरुवात केली आहे,

मुंबई : रणबीर कपूर आणि पत्नी आलिया भट्ट लवकरच पहिल्यांदाच आई-वडील होणार आहेत. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलिया भट्टने तिच्या पहिल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली. तेव्हापासून दोघेही आपल्या बाळाच्या येणाची वाट बघतायत दोघेही त्यामध्ये गुंतले आहेत. याशिवाय रणबीर कपूर आपल्या मुलांच्या या जगात येण्याच्या प्लॅनिंगबद्दलही चाहत्यांना सांगत असतो. सध्या हा अभिनेता त्याच्या आगामी ‘शमशेरा’ या चित्रपटामुळे चर्चेतआहे. त्याचा हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

म्हणूनच बायकांना ‘हुशार’ म्हणतात, नवऱ्याला मूर्ख बनवुन त्याला मारले. विश्वास बसत नसेल तर पहा व्हिडिओ.

दरम्यान, रणबीर कपूर आलिया आणि तिच्या भावी मुलांबद्दल खूप बोलत होता. एका मुलाखतीदरम्यान रणबीर कपूरने त्याच्या शमशेरा चित्रपटाव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरेच काही सांगितले. त्याला विचारण्यात आले की तो त्याच्या पहिल्या मुलाचीतयारी कशा पद्धतीने करतोय? यावर रणबीर कपूर म्हणाला, ‘सध्या मी माझ्या पत्नीसोबत फक्त स्वप्न पाहतोय, प्रत्येक दिवस जसायेतो तसा एन्जॉय करतोय. प्रत्येक नवीन पालकांप्रमाणे. आम्ही कथा वाचतो, आम्ही नर्सरी बनवायला सुरुवात केली आहे, अशा सर्वमजेशीर गोष्टी करत आहोत, पण अशा गोष्टीची तुलना उत्साह, अस्वस्थता आणि चिंता यांच्याशी कशाचीही होऊ शकत नाही. हे सारं तुलनेच्या पलीकडे आहे’.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी एप्रिलमध्ये लग्न केले होते. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शमशेरा या अभिनेत्याच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटात रणबीर कपूरसोबत अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

Latest Posts

Don't Miss