spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आम्ही एकाला चालो रे हीच भूमिका कायम ठेऊ – राजू शेट्टींच चंद्रकांत पाटील ह्यांना उत्तर

आज राजू शेट्टींनी पत्रकारांशी बोलताना महत्वाचे विधान केले आहे . ते आपल्या एकला चालो रे ह्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगतात.

आज राजू शेट्टींनी पत्रकारांशी बोलताना महत्वाचे विधान केले आहे . ते आपल्या एकला चालो रे ह्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगतात. मध्यंतरीच्या काळात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ह्यांनी एक खळबळ जनक वक्तव्य केला होता त्यात त्यांनी सांगितलं कि स्वाभिमानी शेतकरी पक्ष हा आमच्या सोबतच आहे . त्यामुळे राजकीय वातावरणात चांगलीच चर्च चालू झाली . ह्या चर्चाना उत्तर देत आज राजू शेती म्हणाले कि आमही कोणासोबतच जाणारा नाही

राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तसेच माजी आमदार देखील आहेत, त्यांनी सांगितलं कि माझी चंद्रकांत पाटील किंवा भाजप च्या कोणत्याही नेत्याशी ह्याबद्दल चर्चा झालेली नाही. चंद्रकांत पाटील आणि माझी शेवटची भेट हि गृहमंत्री अमित शहा कोळपूर मध्ये आले होते आणि ते तेव्हा घरी आले तेव्हाच झाली, त्यातही हि भेट फक्त मित्रत्वाच्या हेतूने होती त्यात कोणताही राजकीय संवाद झाला नाही . त्यामुळे महायुती किंवा महाविकास आघाडी कोणासोबतही जाण्याचा प्रश्नच येत नाही . आमचा पक्ष वेगळा आहे आणि तो आपल्या मुद्यावर ठाम राहणार आहे

 

नुकताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा कोल्हापूर दौरा झाला . याबाबत राजू शेट्टींना विचारण्यात आलं असता संजय राऊतांशी कोल्हापूर दौऱ्यात कोणत्याही प्रकारची बोलणी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावेळी संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर होते, त्यावेळी आपण शाहुवाडी दौऱ्यावर होतो, असे राजू शेट्टींनी सांगितले. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे चर्चा झाली नसल्याची राजू शेट्टी यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली . हातकणंगले मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी आपण सहयोगी उमेदवार किंवा शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा घेणार का? असे विचारले असता त्यांनी सांगितले की परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. विधानसभेला आमची ज्या ठिकाणी ताकत असेल, तिथे उमेदवार देण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी नमूद केले.

काय वक्तव्य होता चंद्रकांत पाटील ह्यांच?
चंद्रकांत पाटील म्हणले होते कि रासप हे आमच्या सोबत आहे मध्यंतरी स्वाभिमानी शेतकरी संघटना सुद्धा सोबत होती नंतर थोडी लांब गेली ,पण राजू शेट्टी अजूनही आमच्या संपर्कात आहेत .ते आमच्याच सोबत येतील ह्याची आम्हाला खात्री आहे .

हे ही वाचा :

अब्दुल सत्तरांच्या मतदार संघात एकापाठोपाठ एक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

ज्यांनी मला वाढवला त्यांच्याशी पाईक राहणं माझा कर्तव्य आहे – संजय जाधव

मोठी बातमी! Amitabh Bachchan यांचा अपघात, तातडीने मुंबईत रवाना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss