spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

International Women’s Day, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक महिलेला अशा ‘द्या’ महिला दिनाच्या खास शुभेच्छा !

आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यात महिला अग्रेसर नाहीत. अनेक ठिकाणी महिलांना खूप मोलाचे स्थान आहे.

आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यात महिला अग्रेसर नाहीत. अनेक ठिकाणी महिलांना खूप मोलाचे स्थान आहे. परंतु अजूनही काही ठिकाणी महिलांवर अत्याचार, अन्याय केले जातात. परंतु, अशा लोकांना महिलांचे महत्त्व पटवून देणे फार महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच दि. ८ मार्च रोजी सर्वत्र आंतरराष्ट्रीय महिला दिन हा साजरा करण्यात येतो. अनेक ठिकाणी हा दिवस अगदी उत्सहात साजरा केला जातो. यादिवशी अनेक महिलांचे सत्कार केले जातात. त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांना सन्मानित केले जाते. तुम्ही देखील तुमच्या आयुष्यातील प्रत्येक महिलेला जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस आणखी जास्त आनंदीमय करा.

तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका,
तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

“तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार कर्तृत्व अन् सामर्थ्याची ओढून घे नवी झालर स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

“इंग्रजीत म्हणतात लेडी, मराठीत म्हणतात महिला, जिच्यामुळे आपण या जगात श्वास घेतो पहिला, अशा स्त्रीचा प्रत्येकाला वाटतो अभिमान कायम करा अशा स्त्रीचा सन्मान Happy Women’s Day !”

मी सुद्धा स्पर्शू शकते आकाश
फक्त संधी मिळण्याचा आहे अवकाश
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कर्तव्यांसोबत स्त्री घेत आहे उडान
न काही तक्रार नाही थकान…!
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्री म्हणजे वास्तव्य,
स्री म्हणजे मांगल्य,
स्री म्हणजे मातृत्व,
स्री म्हणजे कतृत्व
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आईवडिलांसाठी
परके होऊन हसत हसत
दुसऱ्याच्या घरी मायेची ज्योत पेटवणं
हे धाडस फक्त
एक स्त्रीच करू शकते
महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

हे ही वाचा :

भाजपा विरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका !, नाना पटोले

आम्ही एकाला चालो रे हीच भूमिका कायम ठेऊ – राजू शेट्टींच चंद्रकांत पाटील ह्यांना उत्तर

छत्रपती संभाजी नगर मध्ये औरंगजेबाची कबर नको – संजय शिरसाठ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss