spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shiv Jayanti 2023, तिथीनुसार शिवजयंती निमित्त द्या खास शुभेच्छा!

आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तिथीनुसार साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी आज अनेक कार्यक्रमांचे आयोजन हे करण्यात आले आहे.

आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तिथीनुसार साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी आज अनेक कार्यक्रमांचे आयोजन हे करण्यात आले आहे. शिवजयंती अर्थात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव (Chhatrapati Shivaji Maharaj Birth Anniversary) महाराष्ट्रात एखाद्या मोठ्या सणाप्रमाणे साजरा केला जातो. तर याच तिथीनुसार साजरा करण्यात येणाऱ्या शिवजयंतीच्या तुम्ही देखील व्हाट्सअँप द्वारे द्या काही खास शुभेच्छा.

अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
धन्य धन्य माझे शिवराय
जय जिजाऊ… जय शिवराय
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभ सकाळ
जय जिजाऊ
जय शिवराय
शिवजयंती
(तिथीप्रमाणे)
पाहुनी छत्रपतींचे तेज झुकल्या
सर्वांच्या नजरा..
जन्मदिनी राजे तुम्हाला
मानाचा मुजरा..
शिवजयंती निमित्त सर्व शिवभक्तांना
शिवमय शुभेच्छा..!

आम्ही आहोत फक्त राजेशिवछत्रपतींचे भक्त
जय शिवराय
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन
असेच असावे मावळ्यांचे वर्तन
ही शिवाजी महाराजांची शिकवण
जय भवानी जय शिवराय
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

गाठ बांधून घे काळजाशी
अशी जी सुटणार नाही,
ही आग आहे इतिहासाची
जी विझणार नाही,
मी धगधगता प्राण स्वराज्याचा
मरणार नाही,
शिवछत्रपतींच्या किर्तीला शब्द
माझे पुरणार नाही
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय..
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!

कलम नव्हते कायदा नव्हता
तरीही सुखी होती प्रजा
कारण सिंहासनावर होता
माझा छत्रपती शिवाजी राजा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

सागराचे पाणी कधी आटणार नाही…
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यात रोखली आग..
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

हे ही वाचा : 

Shivjayanti 2023, शिवजयंतीनिमित्ताने जाणून घ्या शिवजयंतीचे महत्व

Shivjayanti 2023, जाणून घ्या कर्तृत्ववान शिवरायांच्या काही खास गोष्टी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss