spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘संगीत देवबाभळी’ नाटकाचा बी.ए च्या अभ्यासक्रमात समावेश…

संगीत देवबाभळी नाटकासाठी मानाचा असा ठरणारा अजून एक क्षण म्हणजे या नाटकाचा मुंबई विद्यापीठाने बीए च्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात केलेला समावेश.

मराठी व्यावसायिक रंगभूमी गाजवणारे भद्रकाली प्रोडक्शन चे संगीत देव-वाबळी हे नाटक लोकांमध्ये अतिशय प्रिय आहे. नाटकाच्या लोकप्रियतेमुळे आतापर्यंत नाटकाला अनेक पुरस्कारांनी गौरवून त्या नाटकाचे कौतुक करण्यात आलेला आहे. उत्तम लेखन दिग्दर्शन अभिनय संगीत या सर्व गोष्टींमुळे दिग्गजांनीदेखील या नाटकाला दाद दिली आहे.देवबाभळी नाटकासाठी मानाचा असा ठरणारा अजून एक क्षण म्हणजे या नाटकाचा मुंबई विद्यापीठाने बीए च्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात केलेला समावेश.

प्राजक्त देशमुख लिखित-दिग्दर्शित ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाला आजवर ४२हून अधिक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. या नाटकाचे ३००हून जास्त प्रयोग झाले आहेत. पॉप्युलर प्रकाशनने ‘देवबाभळी’ हे पुस्तक प्रकाशित केल्यानंतर त्या पुस्तकाची अनेकांनी दखल घेतली आहे. देवत्व लाभलेल्या लखुबाईला आवलीच्या माध्यमातून आलेले लौकिक भान आणि संसारी आवलीच्या साध्या प्रश्नांनी गाठलेली अलौकिक पातळी हा देवबाभळी नाटकाचा केंद्रबिंदू आहे.

देवबाभळी नाटक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा मुंबई विद्यापीठाच्या निर्णयाविषयी नाटकाचा लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख म्हणाला, ‘या नाटकानं खूप काही दिलंय. आपण रंगभूमीची सेवा करत असतो आणि ती सेवा सार्थकी ठरत असते. जेव्हापासून नाटक रंगभूमीवर आलं आहे तेव्हापासून मिळणारा प्रतिसाद आणि पुरस्कार या दोन्हीनं मी भारावून गेलोय. जेव्हा कौतुक थांबलं असं वाटतं तेव्हा तेव्हा नव्यानं नाटकाचा गौरव केला जातो. आता अभ्यासक्रमात नाटकाचा समावेश करून घेतल्यानं मी थक्क झालो आहे.’ साधारण तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या नाटकाचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यातील विषय आणि सादरीकरणामुळे त्याची लोकप्रियता आजही तितकीच आहे.

 

 

Latest Posts

Don't Miss