spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

६८व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये “गोष्ट एका पैठणीची” बाजी

"गोष्ट एका पैठणीची" चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

दिल्ली : मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत मनाचा समजला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर करण्यात आला. कलाकार आणि सिनेसृष्टीतील मंडळी या पुरस्कारची आतुरतेने वाट पाहत असतात. शुक्रवारी ४ वाजता यंदाचा ६८ वाराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा सोहळा दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. यंदाच्या ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट विभागात ”गोष्ट एका पैठणीची” या चित्रपटाने पटकावला आहे.

हेही वाचा

तुम्ही अजून लहान आहात, आमचा अपमान केला तर…; दीपक केसरकर आदित्य ठाकरेंवर संतापले

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा पुरस्कार शंतनू रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला मिळाला. सर्व स्त्रियांना हवीहवीशी वाटणारी साडी म्हणजे पैठणी… हीच पैठणी आगळ्यावेगळ्या रुपात प्रेक्षकांपुढे येण्या आधीच या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी, मृणाल कुलकर्णी आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

हेही वाचा

‘संगीत देवबाभळी’ नाटकाचा बी.ए च्या अभ्यासक्रमात समावेश…

आशा निराशेने सजलेला स्वप्नांचा पाठलाग फार सुंदर असतो जणू एखाद्या पैठणी सारखा.. रंगीत, तलम, मुलायम.. नायिकेच्या मनातल्या अशाच गोजिऱ्या स्वप्नांचा प्रवास ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आता लवकरच येणार आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून ‘फनरल’ या चित्रपटाला गौरविण्यात आले. तर अमोल गोळे दिग्दर्शित ‘सुमी’ हा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरला.

Latest Posts

Don't Miss