spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जुन्या पेंशन योजनेसाठी सुरू असलेल्या आंदोलनातून सरकारने तातडीने मार्ग काढावा, अजित पवार

जुन्या पेंशन योजनेसाठी शासकीय कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण झाला तर सर्वसामान्य जनतेचे हाल होतात.

जुन्या पेंशन योजनेसाठी शासकीय कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण झाला तर सर्वसामान्य जनतेचे हाल होतात. त्यामुळे आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी सरकारने तातडीने प्रयत्न करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली.

सोमवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत आमची जुन्या पेंशन योजनेसाठी बैठक झाली. यात तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारने केला. परंतु जुन्या पेंशन योजनेसाठी शासकीय कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्याचा परिणाम अत्यावश्यक सेवेवर झाला आहे. अत्यावश्यक सेवा बर्‍याच ठिकाणी बंद आहे. संघटनेसोबत चर्चा केली मात्र त्यातून मार्ग निघालेला नाहीय याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. काम बंद आंदोलन मागे घेण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न आणि जुनी पेंशन योजना लागू करण्याबाबत सरकारची काय भूमिका आहे याबाबत सरकारला निवेदन करण्यास सूचना करावी अशी मागणीही अजित पवार यांनी अध्यक्षांकडे केली.

तसेच आज दहाव्या दिवशी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तारांच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले आहे. असंवेदनशील कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा… गद्दार सत्तार हाय हाय… शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो… किसानों के गद्दारोंको जुते मारो सालों को… शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… पन्नास खोके एकदम ओके… बोलाचीच कढी बोलाचिच भात जेवोनिया तृप्त कोण झाला… यंदाचा अर्थसंकल्प वाया गेला…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा दहावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हे ही वाचा :

ईडीच्या कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांना भावना झाल्या अनावर

Satish Kaushik यांच्या मृत्यूप्रकरणाला वेगळं वळण? पोलिसांना सापडली औषधे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss