spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

२० हजार आंदोलक शेतकरी मुंबईच्या वेशीवर, तर सभागृहातल्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले

आपल्या मतदार संघातल्या विविध प्रश्नांची तयारी करुन सदस्य सभागृहात येत असतात. विविध संसदीय आयुधांचा वापर करुन ते आपले प्रश्न सभागृहात मांडत असतात.

आपल्या मतदार संघातल्या विविध प्रश्नांची तयारी करुन सदस्य सभागृहात येत असतात. विविध संसदीय आयुधांचा वापर करुन ते आपले प्रश्न सभागृहात मांडत असतात. मात्र सरकारमधील मंत्री सदस्यांच्या प्रश्नांचा उत्तर द्यायला सभागृहात उपस्थित नसतात. त्यामुळे अनेक वेळा सभागृह तहकुब करण्याची वेळ येते ही गंभीर बाब आहे, हे वारंवार घडत आहे, या प्रकरणी संबंधितांना कडक शब्दात समज देण्यात यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारने याची गंभीर दखल घेण्याची सूचना सरकारला दिली.

राज्यातील सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे तसेच आपल्या मतदार संघातील प्रश्न विविध संसदीय आयुधांचा वापर करुन सभागृहात आपले प्रश्न मांडत असतात. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तसेच सरकारकडून याबाबत उत्तर देण्यासाठी विधानसभेत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येते. मात्र सरकारमधील मंत्री याबाबत गंभीर नसतात. सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मंत्री सभागृहात उपस्थित नसतात. मंत्री उपस्थित नसल्याने सभागृह तहकुब करण्याची नामुष्की अनेक वेळा येते. सभागृहाच्या शिस्तीला धरुन हे योग्य नाही तरी संबंधितांना कडक शब्दात समज देण्याची मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली.

तर भारतीय किसान सभेच्यावतीने लाँगमार्च सुरु करण्यात आला असून दिंडोरीहून आंदोलक शेतकरी रखरखत्या उन्हातून चालत मुंबईच्या वेशीवर आले आहेत. त्यांच्याबरोबरची मुख्यमंत्र्यांची बैठक आज रद्द करण्यात आली आहे, तरी सरकारने आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन त्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली.

वनजमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी वीजपुरवठा, शेती कर्जमाफी यासह अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका, शालेय पोषणआहार कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक, पोलीस पाटील अशा जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषीत करुन शासन वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी लाँगमार्च सुरु करण्यात आला आहे. रविवार दिनांक १२ मार्चपासून दिंडोरी (जि.नाशिक) येथून लॉंगमार्चला सुरवात झाली आहे. या लाँगमार्चमध्ये २० ते २५ हजार आंदोलक शेतकरी सहभागी झाले आहेत. आंदोलक मुंबईच्या वेशीवर दाखल झाले आहेत. तरी सरकारने या आंदोलकांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावे अशी मागणी अजित पवार यांनी केली.

हे ही वाचा :

जुन्या पेंशन योजनेसाठी सुरू असलेल्या आंदोलनातून सरकारने तातडीने मार्ग काढावा, अजित पवार

जनतेच्या मनातील सरकार असतं तर… संजय राऊतांचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss