spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra Kesari, महाराष्ट्रात रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची पत्रकार परिषद पुण्यात आज पार पडली आहे. या बैठकीनंतर महिला कुस्तीसाठी महत्त्वपूर्ण हा निर्णय परिषदेकडून घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची पत्रकार परिषद पुण्यात आज पार पडली आहे. या बैठकीनंतर महिला कुस्तीसाठी महत्त्वपूर्ण हा निर्णय परिषदेकडून घेण्यात आला आहे. महिलांसाठी केसरी कुस्ती स्पर्धेच आयोजन करण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून घेण्यात आला आहे. हा मान सर्वप्रथम सांगली जिल्ह्याला मिळाला आहे. सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. २३ आणि २४ मार्च रोजी सांगलीत या स्पर्धा पार पडणार असून या स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेव मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजयी महिला कुस्तीगीरास महिला केसरी खिताब आणि चांदीची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे. महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दहा वजनी गटासह खुल्या गटांतील कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. त्यानुसार ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६८, ७२ आणि ७६ असे वजनी गट असतील. महाराष्ट्र केसरीसाठी ६५ वजनी गटावरील मल्ल खिताबासाठी लढणार आहेत. ही स्पर्धा फक्त मॅटवर होणार आहे. पहिली महाराष्ट्र केसरी महिला कोण होणार याकडे कुस्तीप्रेमी सोबतच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा :

Uddhav Thackeray Vs Gauri Bhide, उद्धव ठाकरेंना उच्च न्यायालयाचा दिलासा

Rohit Shetty Birthday, एकेकाळी भाडे द्यायला पैसे न्हवते, आता रोहित शेट्टी कमवतो करोडो रुपये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss