spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ठाणे काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, मागण्या मंजूर न झाल्यास आंदोलनाचा इशारा

ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी पदाधिकाऱ्यांसह ठाणे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन ओबीसींच्या विविध मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी पदाधिकाऱ्यांसह ठाणे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन ओबीसींच्या विविध मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदनात बिहार राज्याप्रमाणे प्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी ,एससी,एसटी,ओबीसी व अल्पसंख्यांक समाजाशी संलग्न विविध महामंडळाची कर्जे माफ करावी तसेच शासन दरबारी व कोर्टात सुरू असलेल्या केसेस मागे घ्याव्यात, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा. महाविकास आघाडीच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याची त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी आदी ओबीसींच्या मागण्या संबंधी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून उचित कार्यवाही करावी अशा मागण्या संबंधी निवेदन देण्यात आले.

सदर मागण्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली नाही तर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी राहुल पिंगळे यांच्यासह रवी कोळी, स्वप्नील कोळी, माधुरी रांगळे विजय घाडी, समीर शेख, इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा : 

राज्यामधील तहसीलदार, नायब तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी बेमुदत संपावर

विजय ताड यांच्या हत्येचा उलघडा झाला , माजी भाजप नगरसेवक ठरला मुख्य सूत्रधार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss