spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठामपाच्या सहकार्याने तुरुंगातील महिला कैदी व महिला पोलीसांची कॅन्सर तपासणी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने ठाणे मध्यवर्ती कारागृहातील महिला कैद्यांसाठी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने ठाणे मध्यवर्ती कारागृहातील महिला कैद्यांसाठी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. ठाणे महापालिकेने या शिबिरास सहकार्य केल्याबद्दल कारागृह प्रशासनाने ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर व महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आभार व्यक्त केले आहेत.

तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या महिलांची कॅन्सर या आजाराची तपासणी व्हावी, जेणेकरुन जर आजाराचे निदान झाले तर त्यांना वेळीच उपचार देण्यासाठी मॅमोग्राफी व्हॅनच्या माध्यमातून कारागृहात या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक महिलेने आपली नियमित शारिरिक तपासणी करुन घेणे आवश्यक आहे, यासाठी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या महिला कैदी व कारागृहात ड्यूटीवर असणाऱ्या महिला पोलीसांची कॅन्सर तपासणी करण्यात आली.

महिला कैदी व महिला पोलीस कर्मचारी अशा एकूण ६४ जणांची महिलांची स्तनाच्या कॅन्सरची तपासणी मॅमोग्राफी व्हॅनच्या माध्यमातून करण्‍यात आली. यासाठी ठाणे महानगरपालिकेने मॅमोग्राफी व्हॅन, स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करुन दिले होते. या शिबिरात एकूण १०३ महिलांची स्तनाच्या कॅन्सरची तपासणी करण्यात असल्याचे माता बालसंगोपन अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनी नमूद केले.

हे ही वाचा : 

ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ठाणे काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, मागण्या मंजूर न झाल्यास आंदोलनाचा

सीएमचा मास्टरस्ट्रोक सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss