spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

डोनाल्ड ट्रम्प ह्यांना आज अटकेची शक्यता , समर्थकांना ट्रम्प ह्यांचा भावनिक पत्र

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्यावर २०१६ च्या निवडणूक प्रचारादरम्यान आर्थिक व्यवहारात अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल केला गेला आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्यावर २०१६ च्या निवडणूक प्रचारादरम्यान आर्थिक व्यवहारात अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल केला गेला आहे. ह्या प्रकरणी त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . त्याच सांबांधी आज ट्रम्प ह्यांनी समर्थकांना ई-मेल केला आहे. ई-मेल मध्ये त्यांनी लिहिलेला आहे कि कदाचित हा माझा शेवटचा मेल असू शकतो. आतापर्यंत तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद ह्या लढाईत आपलाच विजय होईल. आणि आपण पुन्हा ट्रम्प हाऊस जिंकू.

न्यूयॉर्क मधील मॅनहॅटन कोर्टात कडक सुरक्षा तयनात करण्यात आली आहे.कारण ट्रम्प ह्यांच्या पोस्ट नंतर त्यांची समर्थक मोठ्या प्रमाणावर निदर्शन करतील अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पोलिसांनी आधीच काळजी घेतली आहे. 2016च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याची माहिती मिळत आहे. हे प्रकरण एडल्ट फिल्म स्टारशी संबंधित आहे. ट्रम्प यांचे स्टॉर्मी डॅनियल्ससोबत अफेअर असल्याचा आरोप आहे आणि ही माहिती लपवण्यासाठी त्यांनी 2016 मध्ये डॅनियल्सला 1,30,000 डॉलर दिल्याचा आरोप आहे. मात्र, येथे मुद्दा पैसे देण्याचा नसून कोणत्या माध्यमातून पैसे देण्यात आले आहे त्यासंदर्भात आहे. त्याचबरोबर ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत

 

२०२४ मध्ये च्या निवडणुकी मध्ये ह्याचा फटका बसण्याची शक्यता.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा आरोप दाखल झाल्यास, ट्रम्प हे गुन्हा दाखल होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष असतील. मात्र, जर ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा गुन्हा दाखल झाला तर, 2024 च्या निवडणुकीपूर्वी त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का असेल. दरम्यान, गेल्या आठवड्याच्या शेवटी ट्रम्प यांनी मंगळवारी त्यांना अटक केली जाऊ शकते, असं वक्तव्य केलं होतं. त्यावेळी समर्थकांनी याला विरोध करण्याची विनंती ट्रम्प यांना केली होती. एनबीसी न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि इतर कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींनी प्राथमिक सुरक्षेचं मूल्यांकन केलं. त्यानंतर मॅनहॅटन फौजदारी न्यायालयाभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याच ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प न्यायाधीशांसमोर हजर राहू शकतात.

Latest Posts

Don't Miss