spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Raj Thackeray Speech Live Updates, आज शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडधडणार, जाणून घ्या प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांची तोफ आज शिवाजी पार्क वर धडधडणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांची तोफ आज शिवाजी पार्क वर धडधडणार आहे. दरवर्षी प्रमाणे आज देखील राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा हा शिवाजी पार्क वर होत आहे. राज ठाकरे यांच्या सभे संदर्भातील प्रत्येक लाईव्ह अपडेट एका क्लीकवर जाणून घ्या…

  • मशिदीवरील भोंगे बंद करा किंवा आम्ही बंद करू, दोन पैकी एक निर्णय एकनाथ शिंदेंना घ्यावाच लागेल. महाराष्ट्रातल्या कामाकडे लक्ष द्या, ही मुख्यमंत्र्यांकडे विनंती
  • कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार मी पहिल्यांदा पाहतो
  • पाकिस्तानमध्ये जाऊन खडसावणाऱ्या जावेद अख्तरांसारखे लोक हवेत
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बसलात
  • शिवसेना पक्ष पाहिला नाही जगलो
  • आताच विधानसभेच्या निवडणुका लावा, सोक्ष मोक्ष लावून टाका
  • उद्धव जिथं सभा घेतात तिथं सभा घेत बसू नका
  • महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले शिंदे पहिलेच
  • बाळासाहेब असते तर शिवसेनेची अवस्था अशी झाली नसती
  • मतदारांनी या या गोष्टी विसरता काम नये
  • निकालानंतर आकडे पाहून राजकारण खेळले
  • राजकारण घरातही झालं आणि बाहेरही झालं
  • शिवसेनेतील भांडण पाहून वेदना
  • नारायण राणे बाहेर गेलेच नसते
  • उद्धव ठाकरेंना पक्ष प्रमुख व्हायचं होत, मुख्यमंत्री व्हायचं होतं
  • उद्धव ठाकरेंना विचारलं तुला काय हवंय ?
  • जे सांगतोय ते छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतोय
  • धनुष्यबाण एकाला झेपला नाही, दुसऱ्याला झेपतो की नाही ?
  • असंख्य जणांनी कष्टाने शिवसेना उभी केली
  • माझा विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी, हे तेव्हाच म्हणालो होतो
  • ती चार टाळकी पक्ष खड्यात घालणार, हे माहित होत
  • शिवसेना, धनुष्यबाण तुझं का माझं? हे पाहून वेदना झाल्या
  • अनेक जण म्हणतात हा संपलेला पक्ष आहे, एकदा गर्दी पहा
  • अनेकांनी संपलेला पक्ष म्हणून टीका केली – राज ठाकरे
  • राज ठाकरेंच्या सभेला सुरुवात
  • अमेय खोपकर यांची सरचिटणीस पदी निवड
  • संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांची नेतेपदी निवड
  • राज ठाकरे सभास्थळी दाखल
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभास्थळी रवाना
  • फडणवीसांनी मनसे फोडण्याचे पाप करू नये- बाळा नांदगावकर
  • उद्धव ठाकरेंना छोट्या भावाबद्दल आपुलकी कधीच न्हवती – बाळा नांदगावकर
  • दोन भाऊ एकत्र यावेत अशी इच्छा होती – – बाळा नांदगावकर
  • इतके लोक सोडून का गेले? याचा कधी विचार केला का ? – बाळा नांदगावकर
  • राज ठाकरे , राणे, भुजबळ का बाहेर पडले? – बाळा नांदगावकर
  • अमित ठाकरे सभा स्थळी दाखल
  • मलाही उत्सुकता आहे, राज ठाकरे काय बोलणार ? शर्मिला ठाकरे
  • अवघ्या काही तासात सुरू होणाऱ्या सभेसाठी कार्यकर्त्यांची राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवास्थानी जमायला सुरवात झाली आहे.
  • राज ठाकरे यांच्या सभेसाठी आता कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली
  • मनसे नेते वसंत मोरे राज ठाकरेंच्या सभेसाठी मुंबईकडे रवाना
  • मनसेच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात कर्जत येथून मनसे सैनिक दादरला रवाना
  • मनसेच्या गुढीपाडव्याचा मेळाव्याची उत्सुकता राज्यातील सर्वच मनसैनिकांमध्ये आहे. राज्यभरातून मिळेल त्या वाहनाने मनसे सैनिक येत आहेत.
  • भिवंडीतून शेकडो कार्यकर्ते शिवाजी पार्कच्या सभेसाठी रवाना
  • नाशिकहून देखील मनसैनिक रवाना झाले आहेत. जवळपास ५ हजाराहून अधिक मनसैनिक सभेला दाखल होणार असल्याचे मनसैनिकांनी सांगितले.
  • पालघर मधील ग्रामीण भागातील १०० बस आणि ८०० खाजगी वाहनांनी हे मनसैनिक मुंबईकडे निघाले आहेत.
  • कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर येथून २०० बसेस जाणार आहे साधारणतः ६ ते ७ हजार मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या सभेला शिवाजी पार्क येथे उपस्थित राहणार आहेत.
  • राज ठाकरे यांच्या सभेसाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत जमत आहेत. विशेषत: मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नाशिक-पालघरमधून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येत आहेत.
  • तसेच आज मशिदीवरील भोंगे, मुंबई महापालिका निवडणूक, शिवसेना, भाजप यासह राज्यातील राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे.
  • तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जय्यत तयारी ही करण्यात आली आहे. राज ठाकरेंची यांची ही अवघ्या काही तासात धडाडणार आहे. आज राज ठाकरे हे काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे लागले आहे. तसेच या सभेसाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून जवळपास २५ हजार लोकांसह ३५० बसेस आणि १५०० कार चाकी गाड्या शिवतिर्थावर जाणार आहेत अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली आहे.

  • आज संध्याकाळी राज ठाकरे यांच्या सभेनिम्मित शिवाजी पार्क परिसरात जोरदार बॅनरबाजी ही करण्यात आली आहे. या सर्व बॅनर वर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे असा आशय हा लिहिण्यात आला आहे. शिवसेना भवनासमोर हे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे जणू काही मनसेने ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न हा केला आहे.

  • आज गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa) दादर येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर मनसेचा मेळावा हा आयोजित करण्यात येतो.

हे ही वाचा : 

Gudi Padwa2023, थेरगावमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त उभारलेली गुढी सात दिवस डौलाने फडकवितात

Gudi Padwa Special गुढीची साडी व मिरवणुकीसाठी फेटे | Dadar Shopping Market

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss