Avinash Jadhav On Mumbra Masjid : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेचा परिणाम राज्यभरात पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील सभेनंतर मनसे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुंबईतील माहीम समुद्रकिनारी असणाऱ्या अनधिकृत दग्यार्चा कारभार राज ठाकरेंनी उघडकीस आणल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत प्रशासनाकडून या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.
माहीम दर्ग्यानंतर सांगलीतही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आल्यानंतर पुण्यात देखील अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. आता ठाण्यातील मनसे देखील आक्रमक झाली आहे. मुंब्रा परिसरातील मशीच मनसेच्या टार्गेटवर आली असून त्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
मुंब्रा येथील डोंगरावर काही अज्ञातांकडून सात ते आठ अनधिकृत दर्गे उभारले असल्याची माहिती ठाणे शहर मनसेने उघडकीस आणली आहे. मुंब्र्याच्या डोंगरावरील हे अनधिकृत मशीद व दर्गे १५ दिवसात हटवा, अन्यथा याठिकाणी हनुमान मंदिर उभारू, असा धमकी वजा इशारा मनसेचे नेते ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित ठिकाणी कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे.
हे ही वाचा :
RAJ THACKERAY SPEECH LIVE, उद्धव जिथं सभा घेतात तिथं सभा घेत बसू नका, राज ठाकरेंचा शिंदेंना कानमंत्र
Gudi Padwa Special गुढीची साडी व मिरवणुकीसाठी फेटे | Dadar Shopping Market
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.