Wednesday, September 25, 2024

Latest Posts

धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने द्या, मनसे नेत्यांनी शिवसेनेला डिवचले

मुंबई : सध्या महारष्ट्रातील राजकारणात सत्तासंघर्ष सुरूच आहे. शिवसेना विरुद्ध शिंदे गटात धनुष्यबाण कोणाचा? यावरून वाद सुरु आहे. याचा फायदा विरोधीपक्षातील नेत्यांनी घेतला असल्याचे हे दिसून येत आहेत. भाजपसह मनसेही शिवसेनेवर टीका करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षातील अंतगर्त वाद चव्हाट्यावर आणला जात आहे. खरी शिवसेना आमचीच असा सूर शिंदे गटाने लावून धरलाय. अशात शालिनी ठाकरे यांनी पुन्हा शिवसेनेला डिवचत एक ट्विट शेअर केल आहे.

मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी शिवसेना डिवचत एक ट्विट शेअर केल आहे, ज्यात त्यांनी म्हंटल कि, “रेल्वे इंजिन भाड्याने द्या म्हणुन उपदेश देणार्‍यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे”, शालिनी ठाकरे यांनी त्याच्या ट्विटच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना सुद्धा टॅग केले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांना मनसेच्या एका स्टेटमेंटबद्दल विचारण्यात आले असता. मनसेच्या या प्रखर टीकेला शिवसेनेकडून काय उत्तर मिळतंय हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.

एक एक करत आमदार, खासदार, पदाधिकारी, माजी नगरसेवक शिंदे गटात सहभाग घेत आहेत. अशात खरी शिवसेना आमचीच असा सूर शिंदे गटाने लावून धरलाय. त्यामुळे शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा आम्हाला मिळालं अशी मागणी या शिंदे गटाने लावून धरली आहे. यासंदर्भात शिंदे गटाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र देखील लिहिल्याचे समजतं.

हेही वाचा : 

बंडखोर आमदारांची तिरडी उठणार अशा कडक शब्दात संजय राऊत यांची टीका

Latest Posts

Don't Miss