spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द केल्यानंतर अनेक राज्यकर्त्यांकडून ट्विट करत राहुल गांधींना समर्थन

Rahul Gandhi : काँग्रेसचे जेष्ठ नेते मा.अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी कारवाई करत त्यांचं संसदेतील सदस्यत्व रद्द केलं आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान कर्नाटकातील एका सभेत राहुल गांधी यांनी देशात पळून गेलेल्या आरोपींबद्दल बोलताना मोदी आडनावा विषयी वक्तव्य केलं होतं.

Rahul Gandhi : काँग्रेसचे जेष्ठ नेते मा.अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी कारवाई करत त्यांचं संसदेतील सदस्यत्व रद्द केलं आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान कर्नाटकातील एका सभेत राहुल गांधी यांनी देशात पळून गेलेल्या आरोपींबद्दल बोलताना मोदी आडनावा विषयी वक्तव्य केलं होतं. बँकांचे हजारो कोटी रुपये थकवून विदेशात पळालेले नीरव मोदी, ललित मोदी यांच्याबद्दल ते यावेळी आहेत बोलत होते. यावेळी त्यांनी ‘सर्व चोरांची आडनावं मोदीच का असतात?,’ असा प्रश्न उपस्थित केला होता. राहुल गांधींच्या या वक्तव्या रोख अर्थतच नरेंद्र मोदी यांच्यावर होता. त्यांच्या याच वक्तव्यास आक्षेप घेत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला होता. राहून गांधींच्या या वक्तव्याच्या विरोधात त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुरत न्यायालयाकडून सुनावण्यात आली होती. राहुल गांधी यांना उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी ३० दिवसांची मुदत वाढ देखील देण्यात आली होती. परंतु न्यायालयाच्या निकालनंतर लोकसभा अध्यक्षांकडून राहुल गांधी यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे.

 

 

राहुल गांधीच लोकसभेतील सभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर आता ट्विटरवर अनेक राज्यकर्त्यांनी हि कारवाई चुकीची असल्याचं ट्विट केलं आहे. तसेच आम्ही राहुल गांधींसोबत असल्याचं या ट्विटमध्ये ते म्हणत आहेत. तसेच काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या कारवाईचा विरोध म्हणून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ब्लॅक वॉलपेपर ठेवले आहेत.

 

हे ही वाचा : 

मुंबईत ग्रँटरोडमध्ये माथेफिरूकडून ५ जणांवर चाकूने हल्ला

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss