spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मालेगावमध्ये आज उद्धव ठाकरे घेणार जाहीर सभा

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज नाशिक जिल्यामधील मालेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा राजकीय घडामोडीचा असणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज नाशिक जिल्यामधील मालेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा राजकीय घडामोडीचा असणार आहे. भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrasekhar Rao) यांची नांदेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत काही महत्त्वाचे नेते पक्ष प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे मालेगावच्या सभेमध्ये आज काय बोलणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेचा आढावा घेण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे मालेगावमध्ये दाखल झाले आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसामध्ये राजकीय वातावरण तापलेले आहे. मालेगावमध्ये ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सभेचे बॅनर लागले आहेत. मालेगाव येथील एमएसजे महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी ७ वाजता जाहीर सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्यांनतर राज्यामध्ये सत्तांतर झाले. त्यांनतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चांगलंच कामाला लागला आहे. उद्धव ठाकरे यांच्यापासून ते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत पक्षाचे इतर नेत्यांचे राज्यभरामध्ये अनेक सभा, दौरे आणि मेळावे घेतले जात आहेत. उद्धव ठाकरे हे सुद्धा मैदानामध्ये उतरले आहेत त्यांनी रत्नागिरीतील खेड (Khed) येथून पहिल्या जाहीर सभेची सुरुवात केली. त्यानंतर आता ते मालेगाव मध्ये दुसरी सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये सभा घेत असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून नाशिकसह मालेगावचे वातावरण भगवामय झाल्याचे चित्र आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची सुद्धा नांदेड जिल्यातील लोह तालुक्यात जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार संकर अण्णा धोंगडे तसेच वंचित आघाडीचे लोकसभा उमेदवार आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे यशपाल भिंगे, बहुजन आघाडीचे सुरेश गायकवाड यांचा भारतीय राष्ट्रीय समितीमध्ये चंद्रशेखर राव यांच्या हस्ते जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे. चंद्रशेखर रब उणचं हा महिन्यातील दुसरा नांदेड दौरा आणि जाहीर सभा होणार आहे.

हे ही वाचा : 

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याविषयी सरकारच्या अनास्थेवरुन अजित पवार सरकारवर संतापले

काँग्रेसने रणशिंग फुंकले, कर्नाटकमध्ये १२४ उमेदवारांची यादी जाहीर

राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द केल्यानंतर अनेक राज्यकर्त्यांकडून ट्विट करत राहुल गांधींना समर्थन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss