spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंब्र्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात, दूषित पिण्याच्या पाण्याचा होतोय पुरवठा

Contaminated Water Mumbra : मुंब्रा येथील शंकर मंदिर,डॉ. आंबेडकर नगर, शिवाजी नगर, अमृत नगर या परिसरात ठाणे महापालिकेकडून दिवसांतून अवघे दोनच तास मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्यास काल पासून दूषित पाणीपुरवठा होत आहे.

Contaminated Water Mumbra : मुंब्रा येथील शंकर मंदिर,डॉ. आंबेडकर नगर, शिवाजी नगर, अमृत नगर या परिसरात ठाणे महापालिकेकडून दिवसांतून अवघे दोनच तास मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्यास काल पासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. हे दूषित पाणी प्यायल्यास कावीळ, उलट्या, जुलाब यासारखे आजार होण्याची शक्यता असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरत आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रा अंतर्गत विविध भागात फुटलेल्या जलवाहिन्या, जलवाहिन्यांची दुरुस्ती इत्यादी कामाच्या अनुषंगाने, कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा व नळास अति दूषित पाणी येणार असल्यास ते पिणे टाळावे, औषधांचा वापर करावा व काही दिवस पाणी उकळून व गाळून पिण्यासंबंधी नागरिकांना जाहीर आवाहन करत योग्य त्या उपाय योजना करणे गरजेचे आहे.

तसेच पाण्याची रंग व चव बदलली असल्यास नमुने घेऊन त्याची चाचणी होणे गरजेचे आहे ही बाब मागील आठवड्यातच ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर देखील महापालिकेकडून मुंब्र्यात दुषित पाणीपुरवठा सुरूच आहे. पाणीपुरवठा देखील दिवसांतून केवळ दोनच तास होत आहे, हे पाणी तरी पालिकेने पिण्यायोग्य पुरवावे अशी मागणी राहुल पिंगळे यांनी केली आहे.

हे ही वाचा : 

आज ठरणार महिला प्रिमीयर लीगचा पहिला विजेता, मुंबई विरुद्ध दिल्ली

साध्या पोलिसांकडून चौकशी करा सगळं हाती येईल, संजय राऊतांचा भुसेंना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss