spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदेंच्या बंडखोरीमागे भाजपचाच हात, उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याने केला खुलासा

निवडणुक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिंदे गटाला नोटीस जारी केली आहे. पुढील चौकशी ८ ऑगस्ट ला होणार आहे.

मुंबई – सेनेतील ४० आमदार शिंदे गटात सामील झाल्यापासून शिवसेनेपुढे आता अस्तित्वाचे प्रश्न चिन्हं उभे राहिले आहे. सध्या सेनेची लढाई सुरू झाली आहे. आता शिवसेना आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात मेळावे, सभा आणि शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. निवडणुक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिंदे गटाला नोटीस जारी केली आहे. दोघांनाही बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील चौकशी ८ ऑगस्ट ला होणार आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याने शिंदेंच्या बंडखोरीमागे भाजपचाच हात असल्याचा खुलासा केला आहे.

हेही वाचा

आपात्कालीन साखळीमुळे बिघडतंय मध्य रेल्वेचे वेळापत्रक

एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी शिवसेनेतून केलेल्या बंडखोरीमागे अजूनही काही प्रश्न अनुत्तरितच आहेत. बंडखोरी का झाली? शिंदे गटाच्या बंडखोरीमागे कुणाचा हात आहे? बंडखोरी होणार याची उद्धव ठाकरेंना आधीपासूनच कल्पना होती का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रत्येक जण याची उत्तरं शोधत आहे. अलीकडेच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि मोठे खुलासे उद्धव ठाकरेंच्या जवळचे सहकारी हर्षल प्रधान यांनी केले आहेत. शिवसेनेत बंडखोरी घडवून आणणं यामागे भाजपचा हात आहे. ही भारतीय जनता पार्टीची स्क्रिप्ट आहे, असा गौपयस्फोट विधान हर्षल प्रधान यांनी केला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ते म्हणाले, “शिवसेना पक्षात बंडखोरी होणं, ही भारतीय जनता पार्टीची स्क्रिप्ट आहे. हे उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितलं आहे. भाजपाला शिवसेना संपवायची आहे. त्यांना तुम्हाला मोठं करायचं नाही. आज ते तुमचा वापर करून घेत आहेत. तुमचा वापर संपला की ते तुम्हाला कुठेतरी अडगळीत टाकून देणार आहेत.” असं हर्षल प्रधान यांनी सांगितलं.

हेही वाचा

‘रंजना अन्फोल्ड’ अभिनेत्री रंजनाचा रंजक जीवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी काय प्रोब्लेम झाला आहे इतपत विचारले होते. तेव्हा आमदारांना भाजपसोबत जायचे आहे असं त्यांनी सांगितलं. उध्दव ठाकरेंनी यावर त्यांना माझ्यासमोर घेऊन या आपण बसून चर्चा करू सांगितलं. परंतू सर्व आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट न घेता थेट सुरत गाठलं आणि पुढे सर्व घडामोडी घडल्या. अशी माहिती हर्षल प्रधान यांनी न्यूज 18 लोकमत ला दिलेल्या मुलाखतीत दिली.

Latest Posts

Don't Miss