spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाण्यातील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर, नाल्यात उतरून मनसेचे आंदोलन

ठाण्यातील कापूरबावडी जंक्शन येथील छोट्या पुलाखाली असणारा नाला सफाई अभावी तुडूंब भरला आहे. ठाणे महानगर पालिका प्रशासनाच्या घनकचरा विभागाचे या नालयाकडे लक्ष्य वेधण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क नाल्यात उतरत निदर्शने केली आहे.

Thane : एकीकडे ठाण्यात विकास कामांचा धडाका पाहायला मिळतो आहे. ठाणे महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी या उपक्रमातंर्गत ठाणे शहराचा चेहरा मोहरा पूर्णतः बदलला जातोय. अशातच वरवर दिवाळी सारखं सजलेल्या ठाणे शहराची आतील सत्य परिस्थिती काय आहे? हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघडकीस आणलं आहे. ठाण्यातील कापूरबावडी जंक्शन येथील छोट्या पुलाखाली असणारा नाला सफाई अभावी तुडूंब भरला आहे. ठाणे महानगर पालिका प्रशासनाच्या घनकचरा विभागाचे या नालयाकडे लक्ष्य वेधण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क नाल्यात उतरत निदर्शने केली आहे. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी ‘ठाण्यात अवताराला कचऱ्याचा बेट’, स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे अशा स्वरूपाच्या घोषणा दिल्या.

मनसेच्या या आंदोलनादरम्यान टाईम महाराष्ट्रने आंदोलन कर्त्यांसोबत संवाद साधला आहे. मनसेचे पदाधिकारी स्वप्निल महिंद्रकर यांनी ठाणे महानगर पालिकेवर यावेळी सडकून टीका केली आहे. “४ हजार कोटींपेक्षा जास्त अर्थसंकल्प ठाणे महानगरपालिकेने मांडला असून त्यातील १०० कोटींहून अधिक रक्कम घनकचरा विभागासाठी प्रशासनाने जाहीर केली आहे. ठाणे शहर जिरो गार्बेज झाली पाहिजे अशी ठाणे महापालिका आयुक्तांची संकल्पना आहे. परंतु याठिकाणी पाहिलंत तर कचऱ्याचं बेट तयार झालेलं पाहायला मिळत आहे. पालिका जर करोडो रुपये घनकचरा विभागाला देत आहे तर या विभागाचे अधिकारी काय करत आहेत? अधिकारी का फक्त पाहायची भूमिका घेत आहेत? येथील स्थानिक या कचऱ्यामुळे आजारपणाने त्रस्त आहेत, पालिकेने लवकरात लवकर या समस्येवर उपाय योजना करावी अन्यथा येणाऱ्या काळात मनसे तीव्र आंदोलन करेल” असा इशारा स्वप्निल महिंद्रकर यांनी दिला आहे.

 मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमातंर्गत ठाणे शहर पूर्णतः बदलत असताना प्रशासनाचं या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्न स्वप्निल महिंद्रकर यांना विचारला असता, ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यांचं या कचरा समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. अधिकारी आयुक्तांच्या डोळ्यात धूळ फेकत आहेत म्हणून तर एवढा कचरा जमला आहे. असं म्हणत स्वप्निल महिंद्रकर यांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रशचिन्ह उपस्थित केला आहे. त्याच बरोबर येणाऱ्या काळात हा कचरा जर साफ झाला नाही तर आक्रमक पवित्रा मनसे घेणार असल्याचा धमकीवजा इशान स्वप्निल महिंद्रकर यांनी प्रशासनाला दिला आहे.

हे ही वाचा : 

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याविषयी सरकारच्या अनास्थेवरुन अजित पवार सरकारवर संतापले

काँग्रेसने रणशिंग फुंकले, कर्नाटकमध्ये १२४ उमेदवारांची यादी जाहीर

राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द केल्यानंतर अनेक राज्यकर्त्यांकडून ट्विट करत राहुल गांधींना समर्थन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss