spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाण्यात रंगली मराठी गझल लेखनाची कार्यशाळा

गझल मंथन साहित्य संस्था आणि आम्ही सिद्ध लेखिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे गझलमंथन संस्थेने वारकरी भवन येथे मराठी गझल लेखन कार्यशाळेचे आयोजन केले होते.

Thane : गझल मंथन साहित्य संस्था आणि आम्ही सिद्ध लेखिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे गझलमंथन संस्थेने वारकरी भवन येथे मराठी गझल लेखन कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत विख्यात गझलकार डॉ. कैलास गायकवाड, प्रमोद खराडे आणि डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारच्या सत्रात डॉ. स्नेहल कुलकर्णी (गारगोटी) यांच्या अध्यक्षतेखाली उत्तरा जोशी (देवगड), रत्नमाला शिंदे (मुंबई), ज्योत्स्ना चांदगुडे (पुणे), ज्योत्स्ना राजपूत (पनवेल), विजया टाळकुटे (पुणे), जयश्री वाघ (नाशिक), संध्या पाटील (सातारा), सुनिती लिमये (पुणे), वैशाली मोडक (डोंबिवली), हर्षदा अमृते (ठाणे) या महिला गझलकारांचा मुशायरा झाला. हा कार्यक्रम ठाणे जिल्हा कमिटीने आयोजित केला होता.

जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र बाजार पेठ संस्थेकडून पैठणी देऊन प्रत्येक महिला गझलकाराचा सन्मान यावेळी करण्यात आला. त्याचप्रमाणे गझल प्रशिक्षक म्हणून भरीव योगदान देणाऱ्या उर्मिला (माई) बांदिवडेकर यांना सन्मान चिन्ह आणि पैठणी देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी बोलताना गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे यांनी गझल लेखन कार्यशाळा आयोजन समितीची घोषणा केली. आणि १३ आणि १४ मे २०२३ रोजी परभणी येथे होणाऱ्या गझल संमेलनाची माहिती दिली. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध गझलकार प्रमोद खराडे यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेचे निवेदन ठाणे जिल्हा अध्यक्ष मानसी जोशी यांनी केले तर जिल्हा उपाध्यक्ष स्नेहा शेडगे,सचिव प्रतिभा चांदूरकर यांनी या सुंदर अशा गझल लेखनाच्या कार्यशाळेचे नियोजन केले होते.

हे ही वाचा : 

ठाण्यातील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर, नाल्यात उतरून मनसेचे आंदोलन

Raj Thackeary यांची कल्पकता आणि CM Shinde यांचं राजकीय धाडस वाढवणार uddhav thackeray यांची डोकेदुखी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss