spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी थेट पोहोचले संसदेत

लोकसभेचे कामकाज सूर असताना राहुल गांधी यांनी थेट संसदेत भेट दिली. सावरकरांच्या वक्तव्यावर बोलल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यामुळे राजकारणात नवीन वादाने जन्म घेतला आहे असे म्हणायला काही हरकत नाही

लोकसभेचे कामकाज सूर असताना राहुल गांधी यांनी थेट संसदेत भेट दिली. सावरकरांच्या वक्तव्यावर बोलल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यामुळे राजकारणात नवीन वादाने जन्म घेतला आहे असे म्हणायला काही हरकत नाही. त्याचबरोबर अदानी (adani group) प्रकरणी जेपीसीच्या मागणीवरून लोकसभेत आजही गदारोळ सुरू असतानाच आज राहुल गांधी हे संसदेत पोहोचले आहेत. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांनी सीपीपी कार्यालयात लोकसभा आणि राज्यसभेच्या काँग्रेस खासदारांच्या बैठकीत त्यांनी त्याची हजेरी दर्शविली.

याच दरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वा. सावरकर वादावरून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत(Sanjay raut ) यांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची बुधवारी राऊत यांच्याशी भेट झाली. यानंतर राजकारणातल्या काही महत्वाच्या घडामोडींबाबत तसेच महाराष्टातल्या राजकीय विषयांवर जवळपास १ तास आमच्या मध्ये चर्चा झाल्याची कबुली संजय राऊत यांनी माध्यमांसमोर दिली. तसेच राज्याच्या राजकारणात सर्व काही ठीक आहे, अलबेल आहे आणि काळजी करण्यासारखे काही नाही, असे उदगार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडले.

 

तसेच यावेळी संसद भवनात राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट झाली. या भेटीनंतर राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांनी मंगळवारी दि. २८ मार्च २०२३ रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्याशी संवाद साधताना सावरकरांचा मुद्दा उपस्थित केला होता आणि महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये या विषयावर एकमत देखील झाले आहे.परंतु,राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेवरून महाविकास (MVA)आघाडीत काही अंशी तेढ निर्माण झाली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी)चे अध्यक्ष शरद पवार(sharad pawar)यांनी मध्यस्थी करत काँग्रेस नेतृत्वाला या मुद्द्यावर उद्धव ठाकरे गट नाराज असल्याची प्राथमिक माहिती दिली होती. दरम्यान, 27 मार्च रोजी दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीपासून दूर राहून शिवसेनेनं दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न यशस्वी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीत राहुल गांधींनी आता सावरकरांवर कोणतेही वादग्रस्त बोलणार नसल्याचे संकेत दिल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

Latest Posts

Don't Miss