Wednesday, September 25, 2024

Latest Posts

‘दगड डोक्यावर ठेवला की छातीवर ठेवला…’, शरद पवारांची चंद्रकांत पाटलांच्या विधानावर प्रतिक्रिया

पुणे : राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकार स्थापनेनंतर आता भाजपच्या नेत्यान कडून खदखद समोर येतेय. आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, रुसून न बसता केंद्रातल्या नेत्यांचा आदेश आपण ऐकल्याचे असे विधान भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. या विधानाचा समाचार आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतला आहे.

शरद पवार पुण्यात माध्यमांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री पदासदंर्भात मोठं विधान केले होते. या विधानावर शरद पवार यानी दगड डोक्यावर ठेवला की छातीवर ठेवला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याची खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : 

एकनाथ शिंदे यांना झेड सिक्युरिटी दिली होती शरद पवारांचे स्पष्टीकरण

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रया दिल्या नंतर पवारांनी इतर राजकीय मुद्यांवर देखील भाष्य केले, एकनाथ शिंदे यांचा झेड सिक्युरिटी बाबत प्रश्न विचारले असता पवार म्हणाले, “आज सकाळी माजी दिलीप वळसे पाटील सोबत भेट झाली त्यानं मी विचारलं की शिंदे साहेबाना तुम्ही झेड सिक्युरिटी दिली होती का तर ते हो म्हणला. मी स्वतः माजी गृह मंत्री यांच्याकडून ऐकले होते. म्हणुन या विषयावर अधिक चर्चा करणे मला योग्य वाटत नाही. असे स्पष मत शरद पवारांनी व्यक्त केले.

रणवीर सिंगला न्यूड फोटोंचं स्वातंत्र्य मग हिजाबला विरोध का? – अबू आझमींचा सवाल

Latest Posts

Don't Miss