spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईच्या मालवणीत शोभायात्रेदरम्यान गोंधळ, दोन गटांत झाले तणावाचे वातावरण निर्माण

काल दि ३० मार्च रोजी सर्वत्र देशभरात श्रीराम नवमी (Ran Navami) चा उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

काल दि ३० मार्च रोजी सर्वत्र देशभरात श्रीराम नवमी (Ran Navami) चा उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. परंतु या उत्साहादरम्यान काही अनपेक्षित घटना समोर येत आहेत. श्रीराम हे त्यागाचे प्रतिक मानले जातात. त्यांनी शांततेचा संदेश दिला. त्यांनी न्यायाला महत्त्व दिलं. आपल्या प्रजेसाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. एक मुलगा म्हणून आपण कसं असावं, एक धनुर्धारी योद्धा म्हणून कसं असावं, एक राजा म्हणून कसं असावं, एक माणूस म्हणून कसं असावं हे श्रीरामांचं चरित्र वाचल्यावर समजतं. पण काल रामजयंतीच्या दिवशीच अनेक अनपेक्षित घटना समोर आल्या आहेत. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरात दोन गटातील वाद विकोपाला गेल्याची अजून ताजी असतानाच त्यात आणखी अनेक घटनांची भर पडली आहे. कोलकाता जवळील पश्चिम बंगालच्या हावडा येथे देखील गुरुवारी संध्याकाळी रामनवमीच्या मिरवणुकीत हिंसाचार भडकल्यानंतर काही वाहने जाळण्यात आली. तर त्यापाठोपाठ मुंबईच्या (Mumbai News) मालाडमधील (Malad) मालवणी (Malvani) परिसरात रामनवमीनिमित्त (Ram Navmi 2023) निघालेल्या शोभायात्रेत काहीसा गोंधळ उडाल्याची बातमी समोर आली आहे.

काल रामनवमी निम्मित मुंबईच्या मालाडमधील (Malad) मालवणी (Malvani) परिसरात निघालेल्या शोभायात्रेत काहीसा गोंधळ हा उडाला होता. दोन गटांकडून या शोभा यात्रेदरम्यान घोषणाबाजी करण्यात आली. या वादामुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ही सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. सध्या मालवणी परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मालवणी पोलीस स्टेशनबाहेर निदर्शनं केली. मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याप्रकरणी पोलीस स्टेशनला भेट देऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल मालवणी येथे रामनवमीनिमित्त शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप युवा मोर्चा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं या शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दोन गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झाली होती. दोन गटांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतरही सर्व सुरळीत न झाल्यामुळे पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेत जो कोणी दोषी असेल त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता ठेवावी, असं आहवानही पोलिसांनी केलं आहे.

हे ही वाचा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्कर विजेते गुनीत मोंगा आणि कार्तिकी गोन्साल्विस यांची भेट

अजय देवगणचा बहुप्रतिक्षित ‘Maidaan’ चित्रपटाचा टीझर रिलीज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss