Wednesday, September 25, 2024

Latest Posts

मामाने भाचीची शुल्लक कारणावरून केली हत्या; आंबा मागितल्याने आला राग

भाची वारंवार मामाकडे आंबा मागत होती. त्यामुळे चिडलेल्या मामाने भाचीची हत्या केली.

उत्तरप्रदेशातील शामली जिल्ह्यातील खेडा कुर्तन गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. मामाने शुल्लक कारणावरून पाच वर्षीय भाचीची हत्या केली आहे. जेवत असताना भाची वारंवार मामाकडे आंबा मागत होती. त्यामुळे चिडलेल्या मामाने भाचीची हत्या केली. उत्तरप्रदेशातील कुर्तन गावात खैरू निशा (मृत) राहत होती. पोलिसांनी आरोपी मामा उमरदीन ला अटक केली आहे.

हेही वाचा

‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत मुंबईकरांना वाटण्यात येणार ‘इतके’ तिरंगे

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खैरू निशा जेवताना मामाकडे सारखी आंब्याची मागणी करत होती. त्यामुळे नाराज झालेल्या मामाने तिची हत्या केली. मामाने सुरुवातीला भाचीच्या डोक्यात रॉडने वार केले. निशाला रक्तस्त्राव होऊ लागला तेव्हा मामाने तिची गळा चिरून हत्या केली आणि तिचा मृतदेह गोणीत भरला. अशी माहिती पोलिसांनी दिली.
खैरू निशा एका मजुराची मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे. ती दुपारपासून बेपत्ता होती. रात्री पोलिसांना तिचा मृतदेह आरोपी उमरदीनच्या घरात सापडला. कांधलाचे एसएचओ श्यामवीर सिंह यांनी सांगितले की, आरोपी गावकऱ्यांसोबत मुलीच्या शोधात गेला होता. पोलिसांना संशय येताच तो पसार झाला.

हेही वाचा

रणवीर सिंगला न्यूड फोटोंचं स्वातंत्र्य मग हिजाबला विरोध का? – अबू आझमींचा सवाल

 

पोलिसांनी सांगितले की, उमरदीनला गावाजवळील जंगलातून अटक केली आणि त्याच्यासोबत हत्येसाठी वापरलेली शस्त्र ताब्यात घेण्यात आली आहेत. गुरुवारी रात्री अटक करून शुक्रवारी कारागृहात पाठवण्यात आले. निशाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून मामा उमरदीन विरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Latest Posts

Don't Miss