spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुन्हा एकदा देशात पसरले कोरोना नावाच्या महामारीचे सावट…

आत्तापर्यंत देशात कोरोनाच्या (Coronavirus) 3824 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दैनंदिन रुग्णांचा विचार केला तर ही 6 महिन्यांतील सर्वाधिक संख्या आहे. तसेच, गेल्या सात दिवसांत ज्या प्रकारे कोरोनाबाधितांमध्ये (Covid-19) वाढ होत आहे. ही वाढ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतरची सर्वाधिक वाढ आहे.

गेले २ वर्ष संपूर्ण देशात कोरोनाचे सावट पसरलेले होते. ते गेल्या वर्षी पासूनच देशावरचे हे सावट कमी होताना दिसत होते. कोरोना काळातील जीवन आठवले तरी, अंगावर थरकाप येतो. कारण दिवसाखेरीच कोरोना बाधितांचा आकडा कोरोना मध्ये मृत झालेल्या मृतांचा एकदा हा वारंवार डोळ्यासमोर वाढताना दिसतच होता. त्यानंतर कोरोना व्हायरस वरच्या लस उपलब्ध करून या देशातील नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यावर उपपाययोजना देखील करण्यात आला. आणि त्यांमुळे कोरोनाचे सावट कमी होण्यास मदत देखील झाली. त्यामळे संपूर्ण देशात आपण आपले सण ,उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम साजरे धुमधडाक्यात साजरे करत होतो. परंतु पुन्हा एकदा कोरोना नावाच्या महामारीने आपले तोंड पुन्हा वर काढले आहे. कोरोनाचा शिरकाव पुन्हा एकदा होईल सुरवात झाली आहे. कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे.

आत्तापर्यंत देशात कोरोनाच्या (Coronavirus) 3824 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दैनंदिन रुग्णांचा विचार केला तर ही 6 महिन्यांतील सर्वाधिक संख्या आहे. तसेच, गेल्या सात दिवसांत ज्या प्रकारे कोरोनाबाधितांमध्ये (Covid-19) वाढ होत आहे. ही वाढ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतरची सर्वाधिक वाढ आहे. हाती आलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात 26 मार्च-1 एप्रिल या कालावधीत भारतात 18,450 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. जी आधीच्या आठवड्यातील 8,781 पेक्षा दुप्पट आहे. कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याची वेळ 7 दिवसांपेक्षा कमी राहिली आहे. गेल्यावेळी हे तिसऱ्या लाटेत घडले होते जेव्हा दैनंदिन आकडे आठवडाभरात दुप्पट होत होते. मात्र, या काळात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. ही दिलासादायक बाब आहे. गेल्या आठवड्यात कोरोनामुळे 36 जणांचा मृत्यू झाला होता. तर त्याआधी हा आकडा 29 होता.अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

गेल्या सात दिवसांत रुग्णांची संख्या दुप्पट होण्यात सर्वात पहिला क्रमांक केरळचा लागतो. केरळमध्ये कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे. केरळमध्ये एका आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या 1333 वरून तिपटीनं वाढून 4000 वर पोहोचली आहे. गोवा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सर्वात वेगवान वाढ झाली आहे. तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, आता सध्या गुजरातमध्ये त्यात घट झाली आहे, तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. तसेच सोशल डिस्टंसिग पाळा आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. घाबरुन जावू नका, तर खबरदारी घ्या, असा सल्ला आरोग्य विभागानं दिला आहे.

हे ही वाचा : 

Trend नुसार, लग्न सोहळ्यतील कपड्यामधील Verity 

इंडियन आयडॉल १३ चा मानकरी ठरला अयोध्येचा ऋषी सिंग

संजय राऊत यांचे नवे ट्विट,PM Narendta Modi यांच्या मुख्य द्वारावर डिग्रीची फ्रेम लटकवा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss