spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाभी जी घर पर है फेम अभिनेता दिपेश भान याचे निधन

मालिकेत दीपेश मलखान सिंगच्या भूमिकेत दिसला होता. दिपेश मालिकेत त्याच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखला होता.

मनोरंजन – टेलिव्हिजन सृष्टीसाठी आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टेलिव्हिजन सृष्टीसाठी ही दु:खद बातमी आहे. भाभी जी घर पर है फेम अभिनेता दिपेश भान याचे निधन झाले आहे. मालिकेत दीपेश मलखान सिंगच्या भूमिकेत दिसला होता. दिपेश मालिकेत त्याच्या कॉमेडीसाठी प्रचंड ओळखला जात होता.  त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.  दिपेशच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही.
अभिनेता दिपेश भान शनिवारी सकाळी तो क्रिकेट खेळत असताना अचानक कोसळला.  त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दीपेशची सह कलाकार चारुल मलिक त्याच्या निधनाच्या बातमीने खूप दु:खी झाली आहे. दीपेशसोबतच्या मैत्रीबद्दल बोलताना चारुलने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले, माझा अजूनही विश्वास बसत नाही.  सकाळी मला याची माहिती मिळाली. मी काल त्याला भेटले आणि तेव्हा तो पूर्णपणे बरा होता. आम्ही एकत्र काही व्हिडिओही बनवले.  मी त्याला गेल्या 8 वर्षांपासून ओळखतेय आणि सेटवर त्याच्या सर्वात जवळची होते. आम्ही एकत्र जेवायचो. तो मला सीन्समध्ये मार्गदर्शनही करायचा. या बातमीवर अजूनही विश्वास बसत नाही असेही ती म्हणाली.
अभिनेता दीपेश भानने अनेक कॉमेडी कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. भाभी जी घर पर हैं याआधी त्याने एफआयआर, भूतवाला आणि कॉमेडी क्लबमध्ये काम केले आहे. एवढेच नाही तर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.  दीपेशच्या निधनाने शोमध्ये तिवारीजींची भूमिका करणारा अभिनेते रोहितेश गौरला ही धक्का बसला आहे. ते म्हणाले, आज आमच्या कॉल टाइमला थोडा उशीर झाला, त्यामुळे मला वाटतं जिमनंतर तो क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर गेला होता. हा त्याच्या फिटनेस रूटीनचा भाग आहे पण क्रिकेट खेळताना तो अचानक पडला. आम्हा सर्वांसाठी हा मोठा धक्का आहे.

Latest Posts

Don't Miss