spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राहुल गांधींना जमीन मंजूर, पुढील सुनावणी ३ मे रोजी

Rahul Gandhi Defamation Case : काँग्रेस नेते व माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत सत्र न्यायालयाने आज जामीन मंजुर केला आहे.

Rahul Gandhi Defamation Case : काँग्रेस नेते व माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत सत्र न्यायालयाने आज जामीन मंजुर केला आहे. राहुल गांधी यांनी २०१९ (in 2019 defamation case) मध्ये प्रचारादरम्यान सगळे मोदी आडनावाचे लोक चोर आहेत, असं वक्तव्य केलं होतं. यानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात सुरत न्यायालयात (Surat District and Sessions Court) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्याय देताना सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी मानत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर लोकसभा सभापतींकडून दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व देखील रद्द करण्यात आलं होतं.

मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने आता जामीन मंजूर केला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ मे रोजी होणार आहे. ३ मे रोजी होणाऱ्या सुनावणीत जर राहुल गांधी यांची शिक्षा रद्द करण्यात आली तरच त्यांचं निलंबन मागे घेतलं जाऊ शकत. या विषयी नेमकं काय होत ते ३ मे रोजीच स्पष्ट होणार आहे. राहुल गांधी यांना फक्त जामीन मंजूर होऊन त्यांचं निलंबन मागे घेतलं जाणार नाहीये. परंतु येणाऱ्याकाळात न्यायालयाकडून निकाल देताना राहुल गांधी यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला जर स्थगिती देण्याचा निर्णय झाला तरच त्यांची खासदारकी रद्द होण्याची जी कारवाई आहे त्याचा विचार केला जाऊ शकतो.

हे ही वाचा : 

अरबी समुद्रातील संशयास्पद बोटीचा पाकिस्तानी कनेक्शन नसल्याचा दावा

Ram Navmi 2023, ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss