spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IPL2023, चेन्नई आणि गुजरातची ताकत वाढणार, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारतात दाखल

गुजरात आणि चेन्नईच्या सामन्यामध्ये आयपीएलच्या १६ व्या सीझनची सुरुवात पराभवाने झाली आहे. प्रत्येक संघाचा एक एक सामना झाला आहे काही संघाना विजय मिळाला आहे.

गुजरात आणि चेन्नईच्या सामन्यामध्ये आयपीएलच्या १६ व्या सीझनची सुरुवात पराभवाने झाली आहे. प्रत्येक संघाचा एक एक सामना झाला आहे काही संघाना विजय मिळाला आहे. तर काही संघाना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू उपलब्ध नव्हते कारण नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये वनडे मालिका सुरू होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आयपीएलसाठी आपल्या खेळाडूंना रिलीज केले नव्हते त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका संघाचे खेळाडू भारतामध्ये दाखल झाले आहेत.

दिल्ली, चेन्नई, गुजरात, लखनौ आणि पंजाब या संघाची ताकद आणखी वाढणार आहे. गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदाराबाद, चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स या संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकाचे खेळाडू भारतात दाखल झाले असून पुढील सामन्यासाठी उपलब्ध असतील. सनरायझर्स हैदराबाद संघाला सर्वात मोठा जिल्हासा मिळणार आहे कारण त्यांचा कर्णधार एडन मार्करम भारतामध्ये दाखल झाला आहे. मार्करमच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार याने सलामीच्या सामन्यात नेतृत्व केले होते. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने सलामीच्या सामन्यांमध्ये विजय मिळवला पण त्यांना फिनिशन डेविड मिलरची कमी जाणवली आता डेव्हिड मिलर हा भारतामध्ये दाखल झाला आहे. पुढील सामान्यांसाठी तो उपलब्ध असेल मिलर यांनी गेल्यावर्षी गुजरातच्या संघामध्ये विजयामध्ये मोलाची भूमिका साकारली होती.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा पंजाब संघामध्ये जोडला गेला आहे. रबाडा पंजाबचा प्रमुख वेगवान गोलंदाज होय. अर्शदीप, रबाडा आणि सॅम करन हे तीन खेळाडू पंजाबच्या गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहेत. दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज क्विंटन डि कॉक आयपीएल २०२३ साठी भारतामध्ये दाखल झाले आहेत. गेल्यावर्षी डिकॉकने लखनौ सुपर जायंट्ससाठी तुफानी फटकेबाजी केली होती. वेगवान गोलंदाज सिसंदा मगाला चेन्नईच्या संघासोबत जोडला आहे. चेन्नईने कायल जेमीसनच्या जागी त्याला घेण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गीडी आणि एनरिक नॉर्किया दिल्लीच्या संघामध्ये दाखल झाले आहेत.

हे ही वाचा : 

मराठी विद्यार्थ्यांना मराठी कीबोर्ड ऐवजी हिंदी कीबोर्ड कशासाठी?, अतुल लोंढे

Mahavir Jayanti 2023: जाणून घ्या या शुभ प्रसंगाची तारीख, इतिहास, महत्त्व

पुन्हा एकदा देशात पसरले कोरोना नावाच्या महामारीचे सावट…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss