spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कांदिवलीत प्लेग्रुपमधील चिमुकल्यांना मारहाण, शिक्षकांविरोधत गुन्हा दाखल

आपण आपल्या मुलांना (Play Group) पाठवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आई-वडील नोकरदार असतात, त्यामुळे मुलांना सांभाळण्यासाठी कोणी नसतं, मुलांना इतर मुलांसोबत राहण्याची, खेळण्याची सवय व्हावी, यासाठी बरेच पालक आपल्या मुलांना बेबी डे केअर, प्लेग्रुप, नर्सरीमध्ये टाकतात आणि पालक देखील अशाप्रकारचे option शोधात असती.

आपण आपल्या मुलांना (Play Group) पाठवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आई-वडील नोकरदार असतात, त्यामुळे मुलांना सांभाळण्यासाठी कोणी नसतं, मुलांना इतर मुलांसोबत राहण्याची, खेळण्याची सवय व्हावी, यासाठी बरेच पालक आपल्या मुलांना बेबी डे केअर, प्लेग्रुप, नर्सरीमध्ये टाकतात आणि पालक देखील अशाप्रकारचे option शोधात असती.अशातच मुंबई (Mumbai) पश्चिम उपनगरातील कांदिवलीमध्ये (Kandivali) शिक्षकांकडून (Teacher) चिमुकल्यांना (Children) त्रास देण्याचा, मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कांदिवली येथील राईम्स अँण्ड रम्बल्स प्ले ग्रुपमध्ये शिक्षिका चिमुकल्यांना मारहाण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आपण मुलांना शिकण्यासाठी, तिथे त्यांचे मन रममाण होण्यासाठी प्लेग्रुपमध्ये पाठवतो की शिक्षकांकडून मारहाण करुन घेण्यासाठी असा प्रश्न उपस्थित हातानं दिसत आहे.

दरम्यान या प्लेग्रुपमध्ये एकूण 28 मुले आहेत आणि या शिक्षिकांनी किती मुलांचा अशाप्रकारे छळ केला आणि मारहाण केली आहे . कांदिवली येथील राईम्स अँण्ड रम्बल्स प्लेग्रुपमध्ये सांभाळायला दिलेल्या महिलेच्या दोन वर्षीय मुलाच्या वागणुकीत मागील काही दिवसांपासून बदल जाणवत होता. मुलगा थोडा रागीट होऊन घरातील लोकांच्या अंगावर मारण्यासाठी येत होता.आणि या आधी कधीच असा प्रकार आपले पाळ्या करत नव्हता मग असे अचानक का करायला लागला असा प्रश्न त्यांच्या मनात आला . तेव्हा त्यांनी घरच्यांच्या मदतीने (playgroup) मध्ये असलेल्या बाकीच्या इतर मुलांच्या पालकांची चौकशी केली असता त्यांची मुले सुद्धा अशाच प्रकारे घरामध्ये वागत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पालकांनी मग प्लेग्रुपच्या मालकांकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर मार्च 1 ते मार्च 27 पर्यंतचे सीसीटीव्ही फूटेज चेक केलं असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी दोन शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कांदिवली येथील राईम्स अँण्ड रम्बल्स प्लेग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना क्रूर मारहाण केली जाते ही धक्कादायक घटना समोर असल्याचे दिसून आले आहे. इथल्या महिला शिक्षकांची दोन ते अडीच वर्षांच्या मुलांना हाताने मारहाण करताना, हाताला धरुन फरपटत नेताना, हाताने गालाचे चिमटे घेताना, पुस्तकाने डोक्यावर मारताना, तसंच मुलांना उचलून बाजूला आपटताना अशा क्रूर वागणूकीचे प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. या प्रकारामुळे संतापलेल्या पालकांनी थेट कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या दोन शिक्षिकांविरुद्ध तक्रार दाखल केली. प्रकाराचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी प्रमुख शिक्षिका जिनल छेडा आणि सहशिक्षिका भक्ती शहा या दोघींविरोधात बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अभिनियम 2000 कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा : 

IPL2023, चेन्नई आणि गुजरातची ताकत वाढणार, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारतात दाखल

‘त्या’ विधानावरून फडणवीसांनी केला राऊतांवर हल्लाबोल

जितेंद्र आव्हाड यांनी दिले बागेश्वर बाबांना खुले चॅलेंज

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss