spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Uddhav Thackeray PC Live, फडणवीस गृहमंत्री न्हवे गुंडमंत्री, तोबडतोब राजीनामा द्यावा, रोशनी शिंदे मारहाणीनंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

काल दिनांक ३ एप्रिल रोजी रात्री ठाण्यात पुन्हा एकदा वाद झाला आहे. ठाण्यातील युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली.

काल दिनांक ३ एप्रिल रोजी रात्री ठाण्यात पुन्हा एकदा वाद झाला आहे. ठाण्यातील युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. ठाण्यात मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची उद्धव ठाकरे यांनी सह कुटुंबीय भेट घेतली आहे. ही भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे, खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुक्त कार्यालयात नसल्याने रोशनी शिंदे प्रकरणी चर्चा होऊ शकली नाही.यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे

सर्वात आधी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर हल्लाबोल हा केला. यावेळी बोलत असताना सर्वोच्च न्यायालयाने सरकार बद्दल नपुसंक शब्द वापर आणि याची प्रचिती काळ ठाण्यात आली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले आहेत कि सरकारच नपुसंक आहे असं म्हणातल्यानंतर पुढे काय बोलावं हा मोठा प्रश्न आहे असं म्हणत चनालाच हल्लाबोल हा केला आहे. या ठाण्याची ओळख म्हणजे, शिवसेनेचे ठाणे, धर्मवीर दीघेनच ठाणे अशी ओळख आहे परंतु ती ओळख पुसून गुंडांचा ठाणे असा करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. आता महिला जर गुंडगिरीची करायला लागल्या तर देशाचं राज्यच ठाण्याचं काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

काल झालेल्या या वादांनंतर उद्धव ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. तसेच त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील चांगलाच हल्लाबोल हा केला आहे राज्याला फडतूस गृहमंत्री मिळाला आहे. तुमची ठाण्यातील नव्हे तर राज्यातील गुंडगिरी मुळासह उखडून टाकण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे, असा सज्जड इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीदेखील उद्धव यांनी केली. फडणवीस हे गृहमंत्रीन्हवे तर गुंड मंत्री आहे असं देखील यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. स्वत: च्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिंदे गटाच्या लोकांनी बेदम मारहाण केली. तरी, त्यावर कारवाई होत नाही. स्वत: च्या कुटुंबीयांची काही गोष्ट असली की आरोपीला परराज्यातूनही अटक होते, असेही ठाकरे यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

अरबी समुद्रातील संशयास्पद बोटीचा पाकिस्तानी कनेक्शन नसल्याचा दावा

Ram Navmi 2023, ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss