spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उन्हाळ्यामध्ये माठातले पाणी पिणे फायदेशीर

उन्हाळा सुरु झाला आहे आणि घराच्या बाहेर पडल्यावर घाम जास्त येतो. तसेच उन्हाळ्यामध्ये तहान देखील जास्त लागते. आपल्याला तहान लागली की आपण फ्रिजमधील पितो पण बरेच लोक मातीपासून तयार करण्यात आलेल्या माठामधील पाणी पितात.

उन्हाळा सुरु झाला आहे आणि घराच्या बाहेर पडल्यावर घाम जास्त येतो. तसेच उन्हाळ्यामध्ये तहान देखील जास्त लागते. आपल्याला तहान लागली की आपण फ्रिजमधील पितो पण बरेच लोक मातीपासून तयार करण्यात आलेल्या माठामधील पाणी पितात. उन्हाळ्यामध्ये मातीमधील पाणी पिल्याने अनेक फायदे आहेत. माठातील पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या. अनेक लोक पाणी थंड पिण्यासाठी फ्रीजचा वापर करतात. फ्रिजमध्ये पाणी खूप थंड होते. जास्त थंड पाणी प्यायल्याने घशासंबंधित समस्या निर्माण होतात. परंतु माठामधील पाणी पिल्याने घशाच्या संबंधित समस्या तुम्हाला जाणवणार नाहीत.

जेव्हा आपण पाणी पिताना पाण्याच्या पीएच पातळीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पाण्याची पीएच पातळी जास्त असेल तर शरीरांच्या आतील अवयवांना खूप नुकसान होऊ शकते. मठात ठेवलेल्या पाण्याची पीएच पातळी संतुलित राहते. माठामधील पाण्यामुळे अम्लीय घटक संतुलित राहतात. माठातील पाणी प्यायल्यामूळे शरीराची पीएच पातळीही संतुलित राहते. उन्हाळ्यामध्ये अनेक लोकांना सनस्ट्रोक होतो. अनेक लोकांना उष्माघाताचा सामना करावा लागतो. ज्या लोकांना उन्हाळ्यामध्ये सनस्ट्रोक होतो त्यांनी माठातील पाणी पिणे गरजेचे आहे. माठामधील पाण्यात पोषक तत्व असतात त्यामुळे हे पाणी प्यायल्याने शरीर तंदुरुस्त राहते. माठातील पाणी प्यायल्यानं शरीरातील मेटाबॉलिज्म बुस्ट होते. प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये बिस्फेनॉलसारखे विषारी रसायन असते. माठातील पाण्यामधील टेस्टोस्टेरोनची पातळी संतुलित असते. ज्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म बुस्ट होते.

गावामध्ये आणि शहरामध्ये मध्ये देखील बरेच लोक आहे हे नियमितपणे माठामधील पाणी पिट असतात. माठातील पाणी पिताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा माठाच्या आतल्या बाजूला बुरशी येते. बुरशी असलेले पाणी प्यायल्यानं शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात जर माठातील पाणी प्यायची सवय असेल तर तो माठ आठवड्यातून दोन वेळा स्वच्छ धुवा. ज्यामुळे माठामध्ये बुरशी लागणार नाही. उन्हाळयामध्ये तुम्ही तांब्याच्या भांड्यातील पाणी देखील पिऊ शकता. तांब हे पोट, लिव्हर आणि किडनीला डिटॉक्स करते. तांब्याच्या भांड्यातील पाणी देखील पिऊ शकता. तांब हे पोट, लिव्हर आणि किडनीला डिटॉक्स करते. तांब्याच्या भांड्यांमध्ये ठेवलेले पाणी प्यायल्याने बॅक्टिरिया मरतात. तसेच तांब पाणी शुद्ध करते. त्यामुळे पोटामध्ये कधीही अल्सर किंवा इन्फेशन होत नाही.

हे ही वाचा : 

अरबी समुद्रातील संशयास्पद बोटीचा पाकिस्तानी कनेक्शन नसल्याचा दावा

Ram Navmi 2023, ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss