spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दबंग अभिनेता सलमान खान लुंगी लूकमध्ये दिसणार

बॉलिवूड अभिनेता सलमान खान लवकरच किसी का भाई किसी की जान या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील गाणे हे नुकतेच रिलीज झाले आहे. तर किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील सलमान खानच्या नवीन गाण्याचे नाव 'बथुकम्मा' रिलीज झाले आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान लवकरच किसी का भाई किसी की जान या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील गाणे हे नुकतेच रिलीज झाले आहे. तर किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील सलमान खानच्या नवीन गाण्याचे नाव ‘बथुकम्मा’ रिलीज झाले आहे. हे गाणे पूर्णपणे साऊथच्या पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात आले आहे. तर या चित्रपटातील गाण्यात त्याने चक्क लुंगी नेसून त्या गाण्यावर थिरकला आहे. आणि आपल्याला माहीतच आहे , जेव्हा सलमान खान कोणत्याही गाण्यावर नाच करतो तेव्हा त्या गाण्यात कोणती तरी हुक (hook step ) त्यामध्येच असते. तर या वेळेस या गाण्यात त्याची (hook step) आहेच परंतु तो लुंगी घालून नाचला आहे. त्यामुळे सलमान खानच्या फॅन्सकडून त्याला या लूकमध्ये बघण्यासाठी चाहते ready आहेत. या गाण्यावर सलमान खानसोबत त्याची co – artist पूजा हेगडे हि पूर्णपणे पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे.

त्याचबरोबर सलमान खान चाहत्यांनी सलमान खानला पहिल्यांदा लुंगी, शर्ट आणि गमछा घातलेला पाहिला असेल. सलमान खानच्या डोळ्यांवर काळा चष्मा आणि कपाळावर चंदनाची पेस्ट आहे. त्याचा लूक पूर्णपणे दक्षिण भारतीय दाखवण्यात आला आहे. सलमानसोबत शहनाज गिल, पलक तिवारी आणि कोरिओग्राफर राघवही दिसत आहेत. सलमान खानचा चित्रपट किसी का भाई किसी की जान हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. आतापर्यंत बॉडी दाखवणारा दबंग खान पूर्ण कपड्यांमध्ये दिसत आहे.बथुकम्मा गाण्याची कोरिओग्राफी उत्तमरीत्या करण्यात आली आहे. हे गाणे पाहून तुम्हाला चेन्नई एक्सप्रेस आणि इतर अनेक साऊथ चित्रपटांची गाणी आठवतील. गाण्यात पूजा केली जात आहे. गावातील महिला पूजेत बसून सहभागी होत आहेत. दृष्यदृष्ट्या गाणे छान दिसते. गाण्याच्या शेवटी सलमान खान प्रवेश करतो. तर हा चित्रपट 21 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी या चित्रपटाचे ३ रिलीज झाले आहेत. ज्यामध्ये ‘बिल्ली-बिल्ली’ ‘जी रहे द हम’ आणि ‘नईयो लगदा दिल’ या गाण्यांचा समावेश आहे. सलमान खानच्या या चित्रपटातून शहनाज गिल आणि पलक बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

हे ही वाचा : 

आदित्य ठाकरे यांनी भाषणातून केला विरोधकांवर हल्लाबोल

ऐरोलीत शाळेच्या विरोधात पालकांच्या तक्रारी

उन्हाळ्यातील नैसर्गिक पेयांपैकी एक कैरीचे पन्हे

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss