spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

देशभरात हनुमान जयंतीचा जल्लोष, वर्षातून दोन वेळा का साजरी केली जाते हनुमान जयंती

Hanuman Jayanti 2023 : हिंदू धर्मात हनुमान जयंतीलासर्वाधिक महत्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान यांचा जन्म चैत्र शुक्ल पौर्णिमेला झाला. त्यामुळे हनुमान जयंती चैत्र शुक्ल पोर्णिमेला साजरी करण्यात येते.

Hanuman Jayanti 2023 : हिंदू धर्मात हनुमान जयंतीलासर्वाधिक महत्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान यांचा जन्म चैत्र शुक्ल पौर्णिमेला झाला. त्यामुळे हनुमान जयंती चैत्र शुक्ल पोर्णिमेला साजरी करण्यात येते. चैत्र शुक्ल पोर्णिमा ही मार्च किवा एप्रिलमध्ये येत असल्याने या दरम्यान हनुमान जयंती साजरी करण्यात येते. परंतु देशातील काही भागात हनुमान जयंती कार्तिक कृष्ण चतुर्दशीलाही साजरी केली जाते. कार्तिक कृष्ण चतुर्दशी ही सप्टेंबर किवा ऑक्टोबर महिन्यात येते. त्यामुळे वर्षातून दोन वेळा हनुमान जयंती साजरी करण्यात येते. हनुमान जयंती वेगवेगळ्या राज्यात विविध पद्धतीने साजरी केली जाते. ओरिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी हनुमान जयंती साजरी करण्यात येते तर तामिळनाडू आणि केरळमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येला हनुमान जयंती साजरी करण्यात येते. त्यामुळे वेगवगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी केली जाते.

हनुमानांविषयी अनेक अख्यायिका रामायणात सुप्रसिद्ध आहेत प्रभू श्रीराम यांचे परमभक्त म्हणून हनुमान यांचा उल्लेख करण्यात येतो. जन्मताच हनुमान यांनी सुर्याला गिळण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख रामायणात वाचायला मिळतो. किष्कींधा नगरीजवळ असलेल्या सुमेधू येथे केसरी आणि अंजना हे राहत होते. मात्र त्यांना मूल झाले नव्हते. त्यामुळे अंजना यांनी वायूदेवाचा तप केल्यामुळे त्यांना वायूदेवाने प्रसन्न होत प्रसाद दिला. त्यामुळे अंजना यांच्यापोटी हनुमान यांचा जन्म झाल्याची अख्यायिका आहे. हनुमान यांच्या जन्माची कथा मोठी रंजक असल्याचे वाल्मिकीकृत रामायणात कथन करण्यात आली आहे. जन्मल्यानंतर लगेच हनुमान यांनी सुर्याला फळ समजून गिळण्याचा प्रयत्न केल्याची घटना रामायणात नमूद करण्यात आली आहे. प्रभू श्रीराम यांचा सेवक म्हणून केलेल्या हनुमानाच्या कार्याची महती रामायणात अनुभवायला मिळते.

हे ही वाचा : 

नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्यवार बरसले

पंकजा मुंडे यांनी सांगितला त्यांच्या नावाचा किस्सा

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ठाण्यात धडक मोर्चा, पोलीस आयुक्तालयाला लावणार ताळे?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss