spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भाजपचा आज ४३व्या वर्धापनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधले

भारतीय जनता पार्टीचा ४३ व वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. यावरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. तसेच त्यांनी यावेळी जनतेला हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला  भाजपा बड्या नेत्यांनी हजेरी लावली आहे.

भाजपचा आज ४३ वा वर्धापन दिवस भाजपचा आज ४३ वा वर्धापन दिवस भारतीय जनता पार्टीचा ४३ व वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा मुखळ्यातून संबंध कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी यावेळी जनतेला हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला अलोट जनसमुदाय जमलेला दिसला. तर नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरवातीलाच भारतीय जनता पक्षाच्या उभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी आपले रक्त दिले आहे त्यांना त्यांनी प्रथम नमन केले. आणि त्यानंतर भारतीय जनता पक्ष हा अनेकांच्या कष्टानं मोठा झालेला पक्ष आहे. भारत देश हा बजरंगबलीच्या बलशाली बनत आहे.

नरेंद्र मोदी यांनी भाजप पक्षाची जडणघडणी सांगण्यास सुरवात केली. भारतीय जनता पक्षाचा आज ४३ वा स्थापना दिवस साजरा केला. ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पक्ष स्थापना झाला. भारतीय जनता पक्षाचे पूर्वीचे नाव जनसंघ होते आणि जे १९७७ मध्ये जनता पक्षात विलीन झाले. तसेच त्याचप्रमाणे भारत हा देश बजरंगबलीप्रमाणे बलशाली बनत आहे. हनुमान जयंतीचे औचित्य साधून हनुमानाला स्मरून बजरंबबली हनुमानाच्या जीवन आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. आजही हनुमानजींचे जीवन भारताच्या विकासाच्या प्रवासात आपल्याला प्रेरणा देते, असे ही नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी देश प्रथम हाच आमचा मुलमंत्र आहे. तसेच भाषणात विरोधी पक्षांवर नरेंद्र मोदी यांनी टिका केली. काँग्रेस हा पक्ष घराणेशाही वर चालणार पक्ष आहे आहे. या पक्षाची संस्कृती आणि विचारसारणी हि खूप संकुचित विचारांची आहे अशी टीका नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून उलगडा केला. परिवारवाद, वशंवाद हीच काँग्रसची ओळख आहे हे मोदी यांनी स्पष्ट केले. आज सर्वत्र बजरंगबलींच्या नावाची घोषणा करत आहेत. त्यांच्याकडे अफाट शक्ती आहे. बजरंगबलीप्रमाणे भर हा देश सक्षम होताना दिसत आहे असे ठाम मत त्यांनी भाषणातून सांगितले. जेव्हा हनुमानजींना राक्षसांचा सामना करावा लागला तेव्हा ते खूप कठोर झाले, त्याचप्रमाणे भारतातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नावर आणि भ्रष्टाचार, सामाजिक प्रश्न याबाबत जेव्हा विचार केला जातो तेव्हा तेव्हा भारतीय जनता पक्षाकडून ठोस पाऊल उचलले जाते.

हे ही वाचा : 

साईबाबांबद्दलच्या ‘त्या’ विधानावर दिलं धीरेंद्र शास्त्रींनी दिले स्पष्टीकरण

देशभरात हनुमान जयंतीचा जल्लोष, वर्षातून दोन वेळा का साजरी केली जाते हनुमान जयंती

भाजपला पोहचायचंय राज्यातल्या ३ कोटी कुटुंबात. Maha #BJP would like to make space in 3 cr. Family

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss