Wednesday, September 25, 2024

Latest Posts

राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबाबत रोहित पवारांचे सूचक विधान; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मी काल युवांना सक्रिय राजकारणात येण्याचं आवाहन करताना येणारा काळा युवांचा असेल असं म्हणालो. परंतु या वक्तव्याचा माध्यमाने चुकीचा अर्थ घेतला तर किती मोठी बातमी होते याचा प्रत्यय काल काही माध्यमांनी दिलेल्या बातम्या पाहून आला.

येत्या काळातील राजकारणाची सूत्रही आपल्या हाती असतील असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. काल म्हणजेच 23 जुलै रोजी रोहित पवार हे जुन्नर दौऱ्यावर असताना, जुन्नर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर मेळाव्यात बोलत होते.

रोहित पवारांच्या या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलेले दिसतंय. २०२४ च्या निवडणुकीनंतर राजकारणाची सूत्रे आपल्या हाती असतील, असे म्हटल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आता या चर्चेबाबत स्पष्टीकरण देताना माझ्या वक्तव्याचा माध्यमांनी चुकीचा अर्थ काढल्याचं रोहित पवारांनी म्हटले आहे.

नियंत्रित सत्ता, केंद्रीय यंत्रणा, दडपशाही यांसारख्या विविध मार्गांनी लोकशाहीवर परिणामी संविधानावर आघात होत आहेत. अशा परिस्थितीत लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्याची सर्वाधिक जबाबदारी युवांवर आहे. युवा वर्गाच्या सक्रिय सहभागाशिवाय लोकशाही विरोधी शक्तींचा पराभव शक्य नाही. आदरणीय पवार साहेब आणि अजित दादांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते युवांना राजकारणात येण्याबाबत मार्गदर्शन करत असतात. त्यादृष्टीनेच मी काल युवांना सक्रिय राजकारणात येण्याचं आवाहन करताना येणारा काळा युवांचा असेल असं म्हणालो. परंतु या वक्तव्याचा माध्यमाने चुकीचा अर्थ घेतला तर किती मोठी बातमी होते याचा प्रत्यय काल काही माध्यमांनी दिलेल्या बातम्या पाहून आला,असे ट्विट रोहित पवार यांनी केला आहे.

दरम्यान, माध्यमांनी रोहित पवार यांच्या विधानाचा घेतलेला चुकीचा अर्थ पाहता ट्विटरच्या माध्यमातून रोहित पवार यांनी माध्यमांवर नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

Latest Posts

Don't Miss