spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वाढत्या वजनाला त्रासलेले आहात? उपाशीपोटी हे मॅजिक वॅाटर नक्की प्या

आपल्या दैनंदिन जीवनात आपण बरेच पदार्थ खात असतो. पण त्या पदार्थाने आपल्या शरीरावर काय परिणाम होतो याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे वजन वाढले आहे हे प्रत्येकाकडूनच ऐकायला मिळते.

आपल्या दैनंदिन जीवनात आपण बरेच पदार्थ खात असतो. पण त्या पदार्थाने आपल्या शरीरावर काय परिणाम होतो याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे वजन वाढले आहे हे प्रत्येकाकडूनच ऐकायला मिळते. वजन वाढल्यामुळे काहींना आजाराला सामोरे जावे लागते. तसेच आजकाल जीमला जाणे, वॅाकला जाणे हे काही जण करतात पण प्रत्येकालाच यासाठी वेळ मिळत नाही. लहान मुलांनमध्ये वजन वाढ जास्त होत आहे. बाहेरील पदार्थामुळे वजन वाढ जास्त होत आहे. परंतु, काळजी करू नका आज आम्ही तुम्हाला असा एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत; ज्यामुळे तुमचे वजन सहज कमी होऊ शकते.

मेडिकल न्यूज टुड्च्या मते, अभ्यासात असे दिसून आले की दलचिनीचे सेवन केल्याने वजन कमी होते. जास्त कॅलरी किंवा जास्त चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने होणारे नुकसान दालचिनीमुळे कमी होते. तसेच आपल्या घरातील वस्तुंपासुन आपण हे मॅजिक वॅाटर बनवू शकतो. मध हे देखील वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे मध आणि दालचिनी दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. हे दोन्ही शरीरासाठी चांगले आहे, त्यामुळे शरीराला कोणताही साइडइफेक्ट होणार नाही.

हे मॅजिक वॅाटर बनवायचे कसे ?

दालचिनी आणि मधाचे पाणी घरीच तयार करता येते. हे तयार करण्यासाठी एक कप पाणी उकळवा आणि त्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर घाला. यानंतर ते गॅसवरून काढुन थंड करा आणि त्यात एक चमचा मध घाला. सकाळी उपाशीपोटी याचे सेवन करा. काहीच दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.

हे ही वाचा : 

अरबी समुद्रातील संशयास्पद बोटीचा पाकिस्तानी कनेक्शन नसल्याचा दावा

Ram Navmi 2023, ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss